विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज झालेली सुनावणी फक्त शिवसेनेच्या याचिकेवरची होती. राष्ट्रवादीच्या याचिकेशी त्या सुनावणीचा काही संबंध नव्हता, असा स्पष्ट खुलासा अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला. Supreme Court hearing only about Shiv Sena MLA disqualification
सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीचे मराठी माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे मिळून रिपोर्टिंग केले गेले आहे, पण सुप्रीम कोर्टातली सुनावणी फक्त शिवसेनेसंदर्भात होती, राष्ट्रवादी संदर्भात नव्हे, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची याचिका क्रमांक 16 होती. शिवसेनेची याचिका क्रमांक 19 होती. शिवसेनेच्या त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. आमच्या याचिकेवर येत्या मंगळवारी सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला विलंब करत असल्याबद्दल सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ताशेरे ओढल्याचे रिपोर्टिंग माध्यमांनी केले आहे, या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी वर उल्लेख केलेला खुलासा केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमचे आदेश पाळले जात नाहीत. तसे करू नका. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मंगळवारपर्यंत वेळापत्रक जाहीर करा. अन्यथा आम्ही आदेश देऊ, अशी कानउघाडणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. पुढच्या निवडणुकांआधी निर्णय घ्यायला हवा. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही तर 2 महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश देऊ, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टात आज पार पडलेल्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. “राष्ट्रवादीची याचिका 16 नंबरची होती. तर शिवसेनेची याचिका 19 नंबरची होती. आमच्या याचिकेवर सुनावणी घेतली गेलीच नाही. येत्या मंगळवारी आमच्या प्रकरणावर सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे. आमचे वकील मुकूल रोहतगी तिथे हजर होते. पण आमच्या याचिकेवर सुनावणी पार पडली नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
“कोर्टात जो काही युक्तिवाद झाला तो फक्त शिवसेना प्रकरणाबद्दल आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रकरणातील काही गोष्टी वेगळ्या आहेत. शिवसेना प्रकरणातील फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस वेगळे आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकरणाला एकसारखं समजून घेणं योग्य नाही. काही जण बाहेर येवून दोन्ही प्रकरणांची सुनावणी एकत्र झाली आहे, असं बोलत आहेत, पण तसं अजिबात झालेलं नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
“कुणी कोर्टात गेले तरी आम्हाला अजून नोटीस दिलेली नाही. आमच्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होईल. ज्या प्रकरणावर सुनावणी झाली त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. कारण ते प्रकरण दुसऱ्या पक्षाचं आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष सुनावणीचं वेळापत्रक जाहीर करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा खोडून काढला. सुप्रीम कोर्टानेच दोन्ही पक्षांचे प्रकरण एकत्र घेण्याचे म्हटले आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App