24 जानेवारीला मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; जरांगेंवर आंदोलनाची वेळ येणार नाही; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने दाखल केलेली पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे त्यावर 24 जानेवारीला सुनावणी आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना पुढचे आंदोलन करण्याची वेळच येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.Supreme Court Hearing on Maratha Reservation on January 24; There will be no time for agitation on Jarangs; Faith of the Chief Minister

मनोज जरांगे पाटलांनी 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी वर उल्लेख केलेला विश्वास व्यक्त केला.



मराठा आरक्षणासाठी रान उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अशातच आता सरकारकडून आश्वासक पाऊल न उचलल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. मात्र त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर आंदोलनाची वेळी येणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले :

मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. सुप्रीम कोर्टाने सरकारची रिव्ह्यू पिटिशन स्वीकारली आहे. 24 तारखेला आम्ही कोर्टासमोर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मांडू. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी दाखविल्या होत्या, त्या सर्व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देताना इतर समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इंपिरिकल डेटा गोळा करण्य़ाचं काम युद्धपातळीवर काम सुरू आहे. सर्वांनी संयम राखावा, जरांगे पाटील यांना आव्हान आहे, की आपल्याला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 मनोज जरांगे पाटील म्हणाले :

निष्पाप पोरांना अडकविण्याचे षडयंत्र सरकारने केलं. यांनी यांचेच हॉटेल जाळले अन निष्पाप मराठ्यांना मध्ये टाकले. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती, सरकार झोपू नका, मराठ्यांना राज्यात शांतता हवीय, त्यांना हुसकवू नका. ते कधीच जाळपोळ करू शकत नाहीत.

ते येवल्याच येडपड, त्याचाच सरकार ऐकतय, ते सोबत बाजाराची पिशवी घेऊन हिंडतंय, त्यात कागद, मग कशाला बोंबलतो रे मग!! तुला म्हटलं होतं नको नादी लावू, मी लई बेकार आहे. आता कसा बारीक आवाज बोलतो, जरांगे साहेब म्हणतो, आळी वळवळ करतो स्वत:ची!!

मी म्हणलं डंगराला कशाला बोलायचं, पण हे येडपट बोलते, मग आपण सोडत नसतो, जर कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला सुट्टी नाही. आमची एकच मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, भुजबळच ऐकू नका, प्रत्येक राज्यातील मोठी जात असलेला समुदाय संपविण्याचा तुम्ही घाट घातलाय, पण सगळ्यांनी ठरवलं तर तुमचा सुपडा साफ होईल, अशी भाषा जरांगेंनी वापरली.

Supreme Court Hearing on Maratha Reservation on January 24; There will be no time for agitation on Jarangs; Faith of the Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात