विशेष प्रतिनिधी
पुणे : मागच्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत कशी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना-(एकनाथ शिंदे)-राष्ट्रवादी- (अजित पवार) आणि भाजप अशा महायुतीच्या बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता पवार विरुद्ध सुळे अर्थात भावजय विरुद्ध नणंद अशी लढत पाहायला मिळणार आहे. Sunetra Pawar’s candidature of Mahayuti announced, Supriya in the field against Sule
शनिवारी दुपारीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत परभणी लोकसभेची जागा घोषित केली. पण ही जागा राष्ट्रवादीने रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना जाहीर केली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत बारामती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार देखील घोषित केला. या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माझ्यासाठी आनंदाचा क्षण
महायुतीच्या वतीने मला राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी तिकिट मिळाले, हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. येणाऱ्या काळात माझा विजय नक्की होईल, लोकांचा देखील प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दादांच्या विचाराला साथ द्यावी, अशी विनंती लोकांकडून केलेली आहे. नक्कीच विजय होईल, असा विश्वास आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शिवतारेंची माघार अन् उमेदवारी जाहीर
विजय शिवतारे यांनी शनिवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन बंडाची तलवार म्यान केली होती. त्यांनी आपण बारामतीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढाई होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, या दोघींनाही आज पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बारामती लोकसभेतील प्रचाराची रणधुमाळी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App