या राजकीय भूकंपावर भाष्य करत अनेक कलाकारांच्या खोचक बोचक पोस्ट व्हायरल
विशेष प्रतिनिधी
पुणे :रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा सुरुंग लागला. राष्ट्रवादी पक्षात महा भूकंप झाला आणि त्याचे झटके जनसामान्यांसोबतच मनोरंजन विश्वालाही बसले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार यांना सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. आणि त्यासोबत राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर नऊ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सामील झाले.Sunday’s political drama, artists poured through social media.
हा सगळा जो काल पवार ड्रामा सुरू होता. तो एखाद्या सिनेमालाही लाजवेल इतक्या ताकदीचा होता.घडणाऱ्या या एकंदरीतच सगळ्या राजकीय घडामोडींबाबत मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या अनेक सेलिब्रिटीज नी या सगळ्या घडामोडींबाबत भाष्य केलं आहे.
https://twitter.com/hemantdhome21/status/1675453771630153728?t=xDw61jYTnUMLIm1SlYU21w&s=08
सोनाली कुलकर्णी, शरद पोंक्षे, स्वप्नील जोशी, हेंमत ढोमे अशा अनेक कलाकारांनी आपल्या समाज माध्यमातून पोस्ट शेयर केल्या आहेत.अभिनेते शरद पोंक्षे यांनी अतिशय संतप्त शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणतात ” तत्व वैचारिक, बैठक, नीतिमत्ता हे शब्द आज वारलेत. ”
The art of writing a great screenplay…! — Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) July 2, 2023
The art of writing a great screenplay…!
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) July 2, 2023
अचानक झालेल्या राजकिय घडामोडींवर प्रतिक्रिया देत सोनाली कुलकर्णीनेही इंस्टाला स्टोरी टाकली आहे, ती तिच्या स्टोरीत म्हणते की, ‘पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?’तर दुसरीकडे “भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!”
असं ट्वीट करत तेजस्विनी पंडितही चर्चेत आली होती. तर सुबोध भावे ने मी जरा एक दिवस मुंबईच्या बाहेर काय गेलो…..क्रमश: असं म्हणत चिमटा काढला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर अभिनेता हेमंत ढोमे याने पोस्ट शेयर केली. तो आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो की, “खेळ तर आता सुरु झालाय…” तर दुसरीकडे स्वप्नील जोशीनेही कोणत्याही राजकिय पक्षाचा उल्लेख न करता एक सुचक पोस्ट केली आहे. त्यात तो म्हणतो, “उत्तम पटकथा लिहिण्याची कला”आता कलाकरांच्या या ट्वीटवर आणि पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more