एमएमआरडीए : मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांना बळ; बँक कर्जाला सरकारची हमी

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास आणि त्याला सरकारी हमी देण्यास शनिवारच्या शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे मुंबई आणि महानगर क्षेत्रातील मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, सी-लिंक अशा पायाभूत प्रकल्पांना बळ मिळणार आहे. Strengthening infrastructure projects in Mumbai metropolis

मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळालेल्या या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12000 कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि सरकारी हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात १ लाख ७४ हजार ९४० कोटींचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल्वे प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर यांसारख्या महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.

निर्णय काय झाला?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम २१ नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार 60000 कोटी पर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली.

Strengthening infrastructure projects in Mumbai metropolis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात