विशेष प्रतिनिधी
पाचगणी : पाचगणी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. पॅराग्लायडिंग प्रि-वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. strawBerry with CM eknath shinde
महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते. या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे असे सांगून बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
पॅराग्लायडिंग हा एक साहसी खेळ असून तो खेळणे साहसी लोकांचे काम आहे. वर गेलेल्या माणसाच्या क्षमतेची कसोटी लागते. या खेळात सहभागी होण्यासाठी आलेल्या १२ देशांतील खेळाडूंचे स्वागत करतानाच लवकरच या खेळाचा वर्ल्ड कप देखील महाराष्ट्रात खेळवला जावा यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
या कार्यक्रमाला साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, ‘टाईम महाराष्ट्र’ चे मुख्य संपादक राजेश कोचेकर, कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App