जवळच्याच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या प्रकल्पातून या पावडरची गळती झाल्याचे समजताच मात्र नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. Strange incident happened in Chembur, rain of white powder started suddenly, accumulated layer of powder everywhere.
विशेष प्रतिनिधी
चेंबूर : चेंबूर वाशीनाका येथे शनिवारी रात्री विचित्र घटना घडली. चेंबूरमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. त्या प्रकल्पातून गव्हाणगावावर पॅटालिस्ट पावडरची शनिवारी रात्री अचानक गळती झाली.ही पावडर कसली आहे आणि कुठून आली याबद्दल कोणालाच काही कळेना.जवळच्याच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या प्रकल्पातून या पावडरची गळती झाल्याचे समजताच मात्र नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले.दरम्यान पोलीस, अग्निशमन दलाला कळवण्यात आले.
दत्त जयंतीनिमित्त गव्हाण गावात भंडारा आयोजित करण्यात आला होते. जमलेले भाविक जेवत असताना त्यांच्या जेवणात ही पावडर पडली. विषारी पावडर असावी या भीतीने त्यांनी जेवणही घेतले नाही. तपासणीनंतर त्यांनी ती पावडर घातक नसल्याचे सांगितले तिथून पुढे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
पावडरचा वर्षाव सुरूच होता आणि वाहनांवरही पांढऱ्याशुभ्र बर्फासारखा पावडरचा थर साठला होता. पावडरचा वर्षाव नेमका कुठून झाला याचा त्यांनी शोध घेतला. त्यावेळी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या प्रकल्पातून पॅटालिस्ट पावडरची गळती झाल्याचे दिसून आले. तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने या गळतीबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App