विशेष प्रतिनिधी
बीड : तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून, सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.Stories of your deeds from Facebook wall to court, Pankaja Munde targets Dhananjay Munde
मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. तसंच यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पंकजांनी टार्गेट केलं होतं. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना, माझ्यावर टीका करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका.
OBC reservation : ठाकरे – पवार सरकारचा ओबीसी आरक्षणाला केवळ “धक्का” नव्हे, तर “धोका”!!; पंकजा मुंडेंचे शरसंधान
कोण काय करतंय याची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या’, असं धनंजय मुंडे म्हणाले होते. धनंजय मुंडे यांच्या याच आव्हानाला पंकजा यांनी प्रत्युत्तर दिलंय.मुंडे यांनी ट्विट करत म्हटलंय, तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत.
बाकी स्वपक्षातील बीड जिल्ह्याच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांच्या लक्षवेधी सुचनांवर आधी जाहीर चर्चा घडवून आणा, नंतर आमचा नाद करा.पंकजा मुंडेंआधी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर प्रहार केला.
जगमित्र कारखान्याच्या नावाखाली एक पत्र्याची पाटी लावून शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणारे, जगमित्र सुतगिरणीवर कर्ज करुन स्वत: जप्तीत गेलेले, परळीत नको ते ऊद्योग करुन व्यापारी बांधवांना दहशतग्रस्त करणारे आज सकाळी जिल्ह्यातील उद्योगांच्या बतावण्या करत आहेत, घोर कलयुग, अशी बोचरी टीका प्रीतम मुंडे कार्यालयाने ट्विट करुन केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App