Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सोमवार हा काळा दिवस ठरला आहे. देशी-विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स 2,000 अंकांनी, तर निफ्टी 600 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 57,000 च्या खाली आणि निफ्टी 17,000 च्या खाली गेला. बाजार बंद होण्यापूर्वी खालच्या पातळीवरून थोडी सुधारणा झाली आणि सेन्सेक्स 1545 अंकांनी घसरून 57,491 अंकांवर, तर निफ्टी 468 अंकांच्या घसरणीसह 17,149 अंकांवर बंद झाला. भारतीय शेअर बाजारांनी 2022 मध्ये मिळवलेले सर्व फायदे गमावले आहेत. बाजार निर्देशांक 27 डिसेंबर 2021 च्या पातळीवर खाली आला आहे. Stock Market Crash Tsunami hits investors, Sensex closes 1545 points and Nifty closes 468 points
प्रतिनिधी
मुंबई : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सोमवार हा काळा दिवस ठरला आहे. देशी-विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स 2,000 अंकांनी, तर निफ्टी 600 अंकांनी घसरला. सेन्सेक्स 57,000 च्या खाली आणि निफ्टी 17,000 च्या खाली गेला. बाजार बंद होण्यापूर्वी खालच्या पातळीवरून थोडी सुधारणा झाली आणि सेन्सेक्स 1545 अंकांनी घसरून 57,491 अंकांवर, तर निफ्टी 468 अंकांच्या घसरणीसह 17,149 अंकांवर बंद झाला. भारतीय शेअर बाजारांनी 2022 मध्ये मिळवलेले सर्व फायदे गमावले आहेत. बाजार निर्देशांक 27 डिसेंबर 2021 च्या पातळीवर खाली आला आहे.
बाजारातील घसरणीच्या त्सुनामीतून कोणतेही क्षेत्र सुटू शकले नाही. मोठ्या दिग्गज समभागांनाच फटका बसला, पण सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात स्मॉल कॅप मिड कॅपला सर्वाधिक फटका बसला आहे. स्मॉल कॅप्समध्ये 4.74 टक्के आणि मिड कॅपमध्ये 3.86 टक्के घट झाली आहे.
याशिवाय बँकिंग सेक्टर, आयटी सेक्टर, ऑटो सेक्टर, फायनान्शिअल सर्व्हिसेस, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.
सेन्सेक्समधील सर्व 30 समभाग घसरले. सर्वात मोठी घसरण टाटा स्टीलमध्ये दिसून आली. टाटा स्टील 6.16 टक्क्यांनी घसरून 1097 रुपयांवर बंद झाला. तर बजाज फायनान्स ५.९७ टक्के, विप्रो ५.३५ टक्के, टेक महिंद्रा ५.०९ टक्के, टायटन ४.७७ टक्के, रिलायन्स ४.०६ टक्के, कोटक महिंद्रा ३.८४ टक्के, एचसीएल टेक ३.८४ टक्के, बजाज फिनसर्व्ह ३.७१ टक्के घसरणीसह बंद झाले.
वाढणाऱ्या शेअर्सवर नजर टाकली तर बाजारात त्सुनामी असूनही काही शेअर्स हिरव्या निशाणीवर बंद झाले आहेत. त्यात बंधन बँकेचा शेअर 4.18 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय सिप्ला 2.84 टक्के, ल्युपिन 2.06 टक्के, ओएनजीसी 1.25 टक्के आणि मुथूट फायनान्स 0.64 टक्के वाढीसह बंद झाले.
Stock Market Crash Tsunami hits investors, Sensex closes 1545 points and Nifty closes 468 points
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App