विशेष प्रतिनिधी
नाशिक : नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर? राज्यव्यापी आंदोलन औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंद्र, कब मिलेगा गैस सिलेंडर?” या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
चुलीवर भाकर बनवून जिल्हाधिकाऱ्यांना तयार केलेले जेवण, मागण्यांच्या निवेदनासह देण्यात आले. शाहीर मेघानंद जाधव यांनी यांनी आंदोलनात देशातील गॅस सिलिंडर तुटवड्यावर ये नरेंद्र दे रे दे सिलेंडर…. ये नरेंद्र दे रे दे सिलेंडर…. हे गाणे सादर केले.
नागपूर येथे चुलीवर भाकर-चटणी बनवून ते जेवण जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात सादर करत त्यासोबत विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
सध्या देशात गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. या परिस्थितीसाठी केंद्र सरकार तसेच नरेंद्र मोदी यांना जबाबदार आहेत. गॅस सिलेंडरचा नियमित व सुरळीत पुरवठा करावा, यासाठी आंदोलन करण्यात आले.
मुंबई, पुणे, जालना, बीड, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, वाशिम आदी शहरांमध्ये सुद्धा हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App