मराठा आरक्षण लढा सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी राज्य सरकार कडून कुणीही कारभारी नव्हता, असा आरोप मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे State government was not serious about Maratha reservation
वृत्तसंस्था
औरंगाबाद: मराठा आरक्षण लढा सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी राज्य सरकार कडून कुणीही कारभारी नव्हता, असा आरोप मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे,
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या दिलेल्या निकालानंतर बोलताना ते म्हणाले, न्यायालय लढाईत टप्पे निहाय रणनीती आखली नाही हेच आजच्या निकालावरून दिसते आहे. मागच्या वर्षी न्यायालयाने स्पष्ट केले होते, स्थगितीचा संबंध नाही. अंतिम निकाल देऊ. याचवेळी प्रकरण वर्ग करणे गरजेचे होते. सरकारची आरक्षण देण्याची इच्छा नव्हती, असे मी म्हणणार नाही.
पण सरकार कडे काही युक्ती देखील नव्हती. आरक्षण रद्द झाले असेल तर आता सरकारकडे काय पर्याय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. निवड झालेले विद्यार्थी, शिक्षण प्रवेशाचा प्रश्न आहे. सरकारने विशेषबाब म्हणून विचार करावा. आम्ही संयमानेच हे प्रकरण हाताळू.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App