विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरमधील एकूण 38 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याआधी 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 53 झाली आहे. कोल्हापूर डेपोत, इचलकरंजी, कागल, मलकापूर, गगनबावडा, गारगोटी, कुरूंदवाड आणि संभाजी नगर येथील एम्प्लॉईजना निलंबित करण्यात आले आहे. तर सेंट्रल बस डेपोत ऑफ कोल्हापूर येथील एकूण पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
ST workers’ agitation: Another 38 ST workers suspended in Kolhapur
एमएसआरटीसीचे डिव्हिजनल कंट्रोलर राहुल पलांघे यांनी टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना सांगितले की, मागच्या सहा दिवसांपासून एकही बस कुठेही गेलेली नाहीये. एम्प्लॉइजना बरीच विनवणी केल्यानंतर सुद्धा त्यांनी कामावर रुजू होण्यास नकार दिला. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकार त्यांच्या मागण्यांवर लवकरच तोडगा काढणार आहे. आणि या आंदोलनाचे रूप अतिशय भयावह होत आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
निजामशाहीमुळे ST कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याला ठाकरे सरकार जबाबदार राहील – आमदार गोपीचंद पडळकर
कर्मचारी आंदोलनं करतात तेव्हा ते भजन,गोंधळ, पूजा अर्चा करताना दिसून येत आहेत. बऱ्याच संघटना त्यांना येऊन अधेमधे सपोर्ट करत आहेत. नुकताच आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी देखील आंदोलनात सहभाग दर्शवला होता. त्याचप्रमाणे कर्मचार् यांच्या घरातील लोक देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App