नरेश म्हस्केंचा जितेंद्र आव्हाडांवर घणाघात, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत
विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते आणि ते बहुजनांचे आहेत असा त्यांनी दावा केला आहे. राम शिकार करून मांस खात असे. म्हणूनच आम्ही पण मांसाहारी आहोत, पण तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.Spokesperson of Eknath Shinde group Naresh Mhaske criticized Jitendra Awhad
आव्हाडांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांसह शिंदे गट आणि अजित पवार गट त्यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तर आव्हाडांवर एकेरी भाषेत टीका केली आहे.
नरेश म्हस्के काय म्हणाले?
नरेश म्हस्के म्हणतात, ”आव्हाड डोक्यावर पडला आहे का? असं लोक आम्हाला विचारतात आता तर आमची खात्रीच पटली आहे की लोक खरंच बोलतात. काय खाऊन बोलतोस तू तुझं तुला कळतं का?, वाटेल ते बोलताना नरडं थोडं जळतं का?, दिवस-रात्र मांसाहार ओरपणारा तू तुला कशी कळेल रामायणाची खरी कथा. तुझ्यासारखे नतद्रष्ट, रामाचं नाव घेतात हीच राम भक्तांची व्यथा.”
याचबरोबर ”मोठे रामायणाचे दाखले देतोस ग्रंथ वाचला का विचारतोस तू? रामायणाचे सगळे ग्रंथ कोणी लिहिले कधी स्वतः बघतोस का रे तू? रामायण लिहिणारे बहुजनच होते पण सत्य आणि धर्मनिष्ठ होते तुझ्यासारखे त्यांच्या डोक्यात नको ते किडे नव्हते. तूच एकदा डोक्यावरचा रुमाल काढून रामायण वाच आणि मग ज्ञान पाजळत गावभर थय थय नाच.” असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
याशिवाय ‘अहो हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, हे बरोबर बरोबर बोलतायत ना? तुमच्या हिंदुत्वाशी अगदी बरोब्बर नाळ जोडतायत ना…?’ असा सवाल करत ठाकरेंवर म्हस्केंनी टीका केली आहे.
आव्हाड म्हणाले- रामाने जंगलात मेथीची भाजी खाल्ली का?
भाषणानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामांना शाकाहारी बनवले जात आहे. पण वनवासात त्यांनी मेथीची भाजी खाल्ली का? या देशातील 80 टक्के लोक मांसाहारी आहेत आणि तेही रामभक्त आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App