विशेष प्रतिनिधी
शिर्डी : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी शिर्डी येथील एका शिबिरात राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. NCP Leader Jitendra Awhad Shirdi Controversy, Said Shri Ram ate Non Veg During Vanvas
राम आमचा आहे, तो बहुजनांचा आहे, असे ते म्हणाले. राम शिकार करून मांस खात असे. म्हणूनच आम्ही पण मांसाहारी आहोत, पण तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात. आपला मुद्दा बरोबर सिद्ध करण्यासाठी त्यांनी असा युक्तिवादही केला की, 14 वर्षे जंगलात राहणाऱ्या व्यक्तीला शाकाहारी जेवण कोठून मिळेल.
शिर्डीतील शिबिरानंतर केलेल्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांनी अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, प्रभू राम मांसाहारी होते आणि ते (सत्ताधारी) त्यांना शाकाहारी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. 14 वर्षे जंगलात राहणाऱ्या व्यक्तीला शाकाहारी जेवण कसे मिळेल? मी पण राम भक्त असून मांस खातो.
आव्हाड म्हणाले- रामाने जंगलात मेथीची भाजी खाल्ली का?
भाषणानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामांना शाकाहारी बनवले जात आहे. पण वनवासात त्यांनी मेथीची भाजी खाल्ली का? या देशातील 80 टक्के लोक मांसाहारी आहेत आणि तेही रामभक्त आहेत.
…आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा – जितेंद्र आव्हाडांचं अजित पवारांना आव्हान!
आम्ही तोंडात राम आणि मनात रावण म्हणत नाही…
त्यांच्या विधानाचे समर्थन करताना आव्हाड यांनी मानवी इतिहासाचा हवाला दिला. ते म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा काहीही पिकत नव्हते तेव्हा सर्व लोक मांसाहारी होते. आव्हाड म्हणाले, “आम्ही कधीच तोंडात राम आणि मनात रावण म्हणत नाही. राम तुमचा बाप नाही आणि आमचाही बाप नाही. रामाचे दर्शन घेणार्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मला विचारायचे आहे की, केवळ आई-वडिलांच्या इच्छेपोटी 14 वर्षांचा वनवास भोगणारा राम या तिन्ही पक्षांत असू शकतो का?
दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हे आमचे, बहुजनांचे आहे. शिकार करून खाणारे राम हे बहुजनांचे आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे असे वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शाहू महाराजांची हत्या करण्याचा कुणी कट रचला होता? बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार कूणी केला हे पाहिलं हवं. शेवटी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपले हक्क आपल्याला दिले. तर ओबीसींच्या मुद्यावरून आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप आता ओबीसींची बाजू आता घेते आणि पूर्वी मंडल विरुद्ध कमंडल हे कुणी केले होते तर ते भाजपने केले होते. बावनकुळे यांना प्रश्न आहे की ज्यावेळी मंडल विरूद्ध कमंडल यात्रा निघाली त्यावेळी तुम्ही कोणत्या चाकावर बसला होता?, असा सवाल त्यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महात्मा गांधाी यांचे नेतृत्व यांना फार अगोदरपासून मान्य नव्हते असा आरोपही आव्हाड यांनी केला. त्यांच्यावर 1947 साली हल्ला झाला नव्हता त्यांच्यावर 1935 आणि 1937 या वर्षातही हल्ला झाला होता. कारण काय तर गांधी हे बानिया होते म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसी च नेतृत्व हे त्यावेळीस सुद्धा मान्य नव्हते असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
तटकरेंवर हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवारांनी 2019 साली जे बंड केले त्यामागे सर्वात मोठा हात होता तो सुनील तटकरे यांचा, त्यांनीच पवार कुटुंब फोडले, आता त्यांच्या घरातही तेच सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App