वृत्तसंस्था
मुंबई : अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांमध्ये सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीच्या मुदतीत चार दिवसांची वाढ एनआयए कोर्टाने आज मंजूर केली. त्याच बरोबर एनआयए कोठडीत जाऊन सचिन वाझे यांच्या चौकशीची परवानगी कोर्टाने सीबीआयला देखील दिली आहे.Special NIA court allows CBI to interrogate Sachin Waze in NIA custody, also directs CBI to coordinate the timings of the interrogation.
त्यामुळे आता वाझेंना एनआयएच्या कोठडीत एनआयएच्या टीम बरोबरच सीबीआयच्या टीमच्या तपास आणि चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सचिन वाझे एनआयए आणि सीबीआय या दोन्ही संस्थांना तपास आणि चौकशीसाठी सहकार्य करण्यास तयार असल्याची माहिती सचिन वाझेंच्या वकीलांनी कोर्टाला दिली.
पण त्याच वेळी सचिन वाझेंना परवा रात्री बेड्या घालून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तपासासाठी नेल्याबद्दल वकीलांनी आक्षेपही नोंदविला. त्यानंतर एनआयए कोर्टाने सचिन वाझेंची एनआयए कोठडीची मुदत ९ एप्रिलपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील अन्य दोन आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि नरेश ढारे या दोघांना एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सीबीआय टीमची एन्ट्री
राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत आली आहे. आता ही टीम पुढे जाऊन मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा तसेच अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि अन्य साखळ्याही जोडणार आहे.
देशमुखांवरील आरोपांच्या तपासासाठी आणि एफआयआर दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांची मुदत दिली आहे.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App