सचिन वाझेंना घेण्याची शिफारस स्वत: उद्धवजींनी केली होती; ती मी नाकारली; फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

प्रतिनिधी

नवी दिल्ली : वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत घेण्याची शिफारस 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः केली होती परंतु ती मी नाकारली असा खळबळजनक खुलासा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. Uddhavji himself had recommended Sachin Waze denied it Exciting revelation of Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे भाजपा मुख्यालयात एका पत्रपरिषदेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :

 • पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते. मनसुख हिरेन यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत.
  मूळ प्रश्न आहे तो एपीआय सचिन वाझे यांना नोकरीत का घेतले गेले.
 • त्यांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव माझ्याही सरकारच्या काळात आला होता. पण, महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन तो प्रस्ताव आम्ही नाकारला.
 • सचिन वाझे हे शिवसेनेत होते, प्रवक्ते होते. शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत.

सचिन वाझे प्रकरणामुळे परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, हेमंत नगराळेंना मुंबईची जबाबदारी


 • कोरोनाचे कारण दाखवून सचिन वाझे यांना सेवेत घेतले गेले. हायकोर्टाच्या आदेशाद्वारे निलंबित असताना सुद्धा. है योग्य नाही.
 • अनेक लहान आरोप असलेले कोणतेही अधिकारी सेवेत परत घेतले गेले नाही. सचिन वाझे यांना घेताना थेट क्राईम इंटिलिजन्स युनिटमध्ये नियुक्ती केली.
 • सचिन वाझे यांना सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवले गेले. मुंबईत डान्सबार चालविण्यासाठी खुली सूट आणि सार्‍यांचे प्रमुख सचिन वाझे होते.
 • मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याची जी माहिती दिली, तेव्हा त्यांची तक्रार प्रारंभी घेण्यात येत नव्हती. पण, तेथेही सचिन वाझे यांनी संबंधित पोलिस ठाण्याला फोन करून तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.
 •  मनसुख यांची सलग तीन दिवस चौकशी सुद्धा सचिन वाझे यांनीच केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक तक्रार सुद्धा लिहून घेतली.
 •  मनसुख हिरेन यांची हत्या झाली, असे आमचे म्हणणे आहे. या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित तशी होताना दिसून येत नाही.
  एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे.
 •  मनसुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयएने घ्यावा, अशी आमची मागणी आहे. हे पोलिसांचे नाही, तर सरकारचे अपयश आहे. सरकार त्यांचा सभागृहात बचाव करीत होती. ज्या उद्देशाने त्यांना सीआययूमध्ये आणण्यात आले, त्याच्या उद्देशाची सुद्धा चौकशी व्हावी.
 •  पोलिस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे.
 •  प्राप्त झालेल्या एकूण कोविड लसींपैकी 56 टक्के लस महाराष्ट्राने वापरलेल्या नाहीत. आम्हाला लस कमी दिल्या जातात, असे सांगून महाविकास आघाडी सरकार राजकारण करीत आहे.

Uddhavji himself had recommended Sachin Waze denied it Exciting revelation of Fadnavis

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*