विशेष मुलांनी बनवल्या खास बाप्पाच्या मूर्ती!

विशेष प्रतिनिधी

पुणे : कामायनी प्रशिक्षण आणि संशोधन सोसायटी संचलित कामायनी गोखलेनगर, पुणे. या संस्थेतील विशेष मुलांसाठी संस्थेत पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमुर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. Special Bappa idols made by special children!

कार्यशाळेचा मुख्य उद्देश हा विशेष विद्यार्थ्यांचे हस्तनेत्र समायोजन वाढण्यास मदत, एकाग्रता वाढण्यास मदत, कमी जास्त, लहान – मोठे ही संकल्पना समजणे, निरीक्षण शक्तीला वाव मिळणे, कलागुणांना वाव मिळण्यास मदत व्हावी तसेच या पर्यावरण पुरक गणेशोत्सव शहरात साजरा करण्याचा संदेश दिला.

चित्रकार श्री उमेश वाघ यांनी प्रात्यक्षिक करून मार्गर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे ट्रस्टी श्रीलेखाताई कुलकर्णी, सोचे कार्याध्यक्ष मा. डॉ आशुतोष भुपटकर, खजिनदार प्रदीप मोघे व कार्यशाळेचे व्यवस्थापक मा. श्री विजय टोपे उपस्थित होते तसेच या कार्यशाळेची संकल्पना प्राचार्या मा. श्रीमती सुजाता आंबे यांनी केले व याकार्यशाळेचे नियोजन शाळेतील सर्व कलाशिक्षकांनी केले.

Special Bappa idols made by special children!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात