विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उमेदवारी देऊन देखील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या छोट्या पक्षांच्या नेत्यांचे कान उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीतल्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांची राजकीय वर्तणूक अशीच राहिली तर आपण करायचे काय??, याचा विचार करण्याची वेळ शेकाप, शिक्षक भारती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेत्यांवर आली आहे.
शरद पवारांनी आपल्या राजकीय कौशल्याने छोट्या पक्षांना महाविकास आघाडीशी बांधून ठेवल्याचे मराठी माध्यमांनी भरपूर कौतुक केले. पण प्रत्यक्षात राजकीय लाभ द्यायची वेळ आली, तेव्हा पवार या छोट्या पक्षांना तो लाभ देऊ शकले नाहीत. राजू शेट्टींना राज्यपाल नियुक्त आमदार करू शकले नाहीत. कपिल पाटील, जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही.
त्यामुळेच आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी छोट्या पक्षांच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. शरद पवारांवर भरवसा ठेवून महाविकास आघाडीशी जोडून राहण्यात मतलब नाही, असा विचार छोट्या पक्षांमध्ये बळावत चालला आहे.
त्यातच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतल्या पराभवाच्या जखमेवर एक सोशल मीडिया पोस्ट लिहून मीठ चोळले आहे.
विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !! महाराष्ट्र पाहतोय… ◆लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. ◆मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील… pic.twitter.com/4ax2PdKyMl — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 13, 2024
विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!
महाराष्ट्र पाहतोय…
◆लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही.
◆मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील… pic.twitter.com/4ax2PdKyMl
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 13, 2024
ते असे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App