विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Siddhi Kadam सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधून शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सिद्धी कदम या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या उमेदवार आहेत.
मोहोळ मतदार संघात सिद्धी कदम यांचा सामना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघात राजन पाटील यांचे वर्चस आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ पाच बचत योजनांवर FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज!
रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घोटाळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग 8 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं. याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. सिद्धी कदम निवडून आल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात कमी वयाच्या आमदार म्हणून नवे रेकॉर्ड होऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App