विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shrikant Shinde सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, सभागृहात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावर तीव्र चर्चा रंगली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार चकमक होत आहे. आज लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार भाषण करत काँग्रेसवर आणि विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. श्रीकांत शिंदेंचे भाषण सुरू असताना विरोधकांनी ‘50 खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. यामुळे श्रीकांत शिंदे संतापल्याचे पाहायला मिळाले.Shrikant Shinde
आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत, ऑपरेशन सिंदूर हा ‘तमाशा’ असल्याचे विधान निराधार असल्याचे म्हणाले. यावेळी त्यांनी एक कविता सादर करत भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याचे कौतुक केले आणि ऑपरेशन सिंदूरद्वारे न्याय मिळाल्याचे ठामपणे सांगितले. मात्र, त्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.Shrikant Shinde
नेमके काय घडले?
ऑपरेशन सिंदूर हा केवळ सरकारचा तमाशा होता, असे विधान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी संसदेत केले. त्यांच्या या विधानावरून श्रीकांत शिंदे यांनी आज सभागृहात निशाणा साधला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलताना एका कवितेच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले. तसेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी न्याय केला असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्येक देसवासीयांमध्ये देशभक्तीची ज्वाळा आहे. मात्र, तरीही विरोधक या ठिकाणी विचारत आहेत की, दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले? त्या दहशतवाद्यांचे पुढे काय झाले? असे खासदार श्रीकांत शिंदे बोलत असताना विरोधी पक्षातील काही खासदारांनी अचानक ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना बोलताना अडथळा निर्माण झाला.
“तुम्ही आता मॅच्युअर व्हा, तुम्ही महापालिकेत नाहीत. तुम्ही आता सभागृहात आहात. देशाच्या संसदेत आलेला आहात. त्यातून (50 खोके एकदम ओके या घोषणेतून) बाहेर या”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना फटकारले. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी बंद केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App