वृत्तसंस्था
अमरावती : येथे राहणारे केमिस्ट उमेश कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी काही मुस्लिम हल्लेखोरांनी हत्या केली होती. त्या रात्री ते मेडिकलमधून परतत असताना ही हत्या झाली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टवरून कोल्हे यांची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून 5 आरोपींना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. उदयपूरमध्ये कन्हैयालालची दोन मुस्लिम तरुणांनी हत्या केल्याच्या आठवडाभरातच हे प्रकरण घडले.Shocking Chemist’s throat slit murder in Amravati, post in support of Nupur Sharma, murder suspect
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील अमरावती येथे अमित मेडिकल नावाने फार्मसी चालवणारे 54 वर्षीय केमिस्ट उमेश कोल्हे त्यांचा मुलगा संकेत आणि सून यांच्यासोबत स्वतंत्र दुचाकीवरून घरी जात होते. 22 जूनच्या रात्री हल्लेखोरांनी कोल्हेंवर हल्ला केला. घटनेनंतर उमेश यांचा मुलगा आणि सून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले होते.
आतापर्यंत 5 जणांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार
उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने दिलेल्या तक्रारीनंतर अमरावती येथील शहर पोलिस ठाण्यातील तक्रारीत मुदासीर अहमद आणि २५ वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना २३ जून रोजी अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत आणखी चार जणांचा सहभाग उघड झाला. त्यापैकी अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२) आणि अतिब रशीद (२२) या तिघांना २५ जून रोजी अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी शमीम अहमद फिरोज अहमद हा फरार आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान कळले की, कोल्हे यांनी नुपूर शर्माचे समर्थन करणारी सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर फिरवली होती. चुकून त्यांनी हा संदेश मुस्लिम सदस्य असलेल्या एका ग्रुपवर पोस्ट केला होता. ते लोकं त्यांचे ग्राहकदेखील होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने म्हटले आहे की, हा पैगंबराचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पाहिजे. अमरावती शहर पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून आम्ही बाकीच्यांचा शोध घेत आहोत, ज्यांच्या अटकेमुळे हत्येमागील हेतू स्पष्ट होईल.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App