एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोणाला शिवसेनेत आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट तयार झाल्याचे भासत असेल तर ते चूक आहे!! वास्तविक शिवसेनेत 2 नव्हे, तर 3 गट पडले आहेत. पहिला गट हा रस्त्यावरच्या शिवसैनिकांचा, गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांचा आणि मातोश्रीवर शरद पवारांचा असे हे गट पडले आहेत!! Shivsena splits : Uddhav Thackeray gives contract to run Shivsena to sharad Pawar
– मराठी माध्यमांचे हातचे राखून रिपोर्टिंग
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तसेही मराठी माध्यमांनी परस्पर शिंदेसेना की शिवसेना??, वगैरे रिपोर्टिंग करून आपल्या पातळीवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना दोन्ही सेनांना “अधिमान्यता” देऊनच टाकली आहे!! जणू काही राज्यपाल आणि विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्याकडे फक्त औपचारिक निर्णय उरल्याचे मराठी माध्यमांनी दाखवून दिले आहे!! पण हे करताना “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांनी हातचे राखले आहे. ते अजूनही उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही ठाकरे यांचीच मानत आहेत!! वास्तविक ती कालपासूनच खऱ्या अर्थाने पवारांची बनली आहे.
– मातोश्रीवर पवार सेनेवर शिक्कामोर्तब
ज्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचा आपला मनसूबा पवारांच्या सल्याने बाजूला ठेवला, त्या क्षणी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना पवारांची बनली आहे!! आणि आज 24 जून 2022 रोजी रात्री मातोश्रीवर सुमारे 2 तास झालेल्या बैठकीत “पवारसेनेवर” उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब करून टाकले आहे!!
मराठी माध्यमांनी तर शिवसेना वाचवायला पवार पुढे सरकले अशा बातम्या स्वयंघोषित पद्धतीने केव्हाच देऊन टाकल्या आहेत, पण त्यावर आता दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री शिक्कामोर्तब करून टाकले आहे!!
– रस्त्यावरची शिवसेना शिवसैनिकांची
रस्त्यावरची शिवसेना ही मात्र शिवसैनिकांची उरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे घराण्यातला असला की झाले. आपण शिवसैनिक आहोत हे दाखवण्यासाठी ते नेहमीच शिवसेनेचे भगवे खांद्यावर घेऊन फडकवत ठेवणार आहेत. एरवी शिवसेनेत बंडखोरी झाली की शिवसेनेची ठाकरे सेना बाहेर पडून जबरदस्त राडे घालायची. बंडखोरांच्या छातीत धडकी भरवायची. छगन भुजबळांसारख्या बंडखोराला तर आपल्या बेडरूम मधला दिवाणात लपून बसावे लागले होते. ही शिवसेनेतल्या ठाकरे सेनेची हिंमत होती आणि दरारा होता!!
– दरारा केव्हा संपला
पण तो दरारा केव्हाच संपुष्टात आला आहे. आता उरली आहे, म्हणजे “होती”, ती उद्धव ठाकरेंची शिवसेना!! आज मातोश्रीवरच्या रात्रीच्या बैठकीत ती सेना उद्धव ठाकरेंनी पवारांना आंदण देऊन टाकली आहे!!
– शिंदेसेना, शिवसेना, पवारसेना!!
जी काही सेना वाचेल ही पवारांची सेना असेल. सरकार टिकले तरी पवारांचे, गेले तरी पवारांचे!! ही सरळ सरळ भूमिका मातोश्री वरच्या आजच्या बैठकीतून न सांगता बाहेर आली आहे!! वास्तविक मातोश्री वरचा दोन तासाच्या बैठकीत नेमके काय झाले?? काय घडले?? काय बिघडले?? हे अधिकृत रित्या शिवसेना अथवा पवारांनी सांगितलेले नाही. पण रस्त्यावरची शिवसेना शिवसैनिकांची. गुवाहटीतली आमदारांची शिवसेना शिंदेंची आणि मातोश्री वरची शिवसेना पवारांची झाली आहे, ही वस्तुस्थिती आता लपून राहणार नाही!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App