प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगात जो शह – काटशहाचा खेळ सुरू झाला आहे, त्यातून बंडखोर आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्ताव आणलेल्या विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या निलंबनाबाबत अथवा आमदारकी रद्द करण्याबाबत नियमानुसार निर्णय घेता येत नाही. Rebel MLAs’ no-confidence motion against Assembly Vice President Narhari Jirwal
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची उमेदवारी रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना शिवसेनेकडून पत्रही देण्यात आले. पण त्याचबाबत आता शिंदे गटानेही मोठी खेळी खेळी केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधातच अविश्वास प्रस्ताव बंडखोर आमदार आणणार आहेत. बंडखोर आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे उपाध्यक्षांविरोधातच अविश्वास ठराव आणल्यामुळे त्यांना आता आमदारांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, असे पत्र अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे.
उपाध्यक्षांना पत्र
आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहोत. 2019 ची निवडणूक आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत. शिवसेनेच्या काही आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. पण घटनेच्या 10व्या परिशिष्टानुसार, पिठासीन अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव असेल तर ते आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. ज्या आणदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जात आहे, त्या आमदारांना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ देणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत उपाध्यक्षांनी आमदारांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला तर तो योग्य नसल्याचे पत्र अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी नरहरी झिरवळ यांना पाठविले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App