प्रतिनिधी
ठाणे – भाजपशी जुळवून घ्या अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा तोच राग आळवला आहे. मी स्वतःच अडचणीत आहे. इतर मंत्र्यांच्या अडचणीचे प्रश्न मला काय विचारता, असा प्रतिसवाल सरनाईकांनी पत्रकारांना केला. पण त्याचवेळी त्यांनी शिवसेना नेतृत्वाला बुचकळ्यात टाकले…!! Shivsena MLA Pratap Sarnaik again throws solvo on Shiv Sena leadership
प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलाय. आपण पुन्हा भाजपशी जुळवून घ्या, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. त्यानंतर आता तर त्यांनी आपण किती अडचणीत आहोत याबाबत जाहीरपणे सांगून शिवसेना नेतृत्वाची देखील अडचण करून ठेवली आहे.
ठाण्यामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करतात. मात्र यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध आणले आहेत. यामुळे यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार नाही. हे लक्षात घेऊन संस्कृती युवा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवा करता करत असलेला लाखो रुपयांचा खर्च शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजिवडा या मतदार संघामध्ये आरोग्य सुविधा देण्याकरता वापरणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचा लोकार्पण कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमानंतर आमदार प्रताप सरनाईक यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपण नारायण राणे त्यांच्यावर भाष्य करण्या इतपत मी मोठा नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पण एवढीच प्रतिक्रिया व्यक्त करून ते थांबले नाहीत.
पत्रकारांनी प्रताप सरनाईकांना अनिल परबांच्या व्हायरल विडिओबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “इथे मीच स्वतः अडचणीत आहे. इतरांच्या अडचणी बद्दल मला काय विचारता…” हे बोलताना प्रताप सरनाईक थोडे हसले. पण त्यांच्या चेहऱ्यावर तणाव होता. प्रश्नाचे सरळ उत्तर देण्याऐवजी त्यांनी पत्रकारांनाच प्रतिसवाल करून टाकला. मी स्वतःच अडचणीत आहे, तर इतर मंत्र्यांच्या अडचणींचे प्रश्न मला काय विचारता, असे विचारून त्यांनी स्वतःच आपल्या जुन्या जखमांवरची खपली काढली.
नारायण राणे अटक प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक आमदार, मंत्री यांच्याविरोधात पुन्हा ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू होईल अशी चर्चा जोर धरू लागली आहे. हे लक्षात आल्यामुळेच प्रताप सरनाईक यांनी वरील वक्तव्य केले असेल का? अशा चर्चेने ठाण्यात जोर धरलाय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App