आमदार अपात्रतेच्या निकालात शिवसेनेच्या घटनेचा आधार!!; उज्ज्वल निकमांचे मत

वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना आमदारांसाठी आजचा बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देणार आहेत. राज्यघटनेच्या डाव्या अनुसूची चा आधार घेऊन आपण निकाल देऊ असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आधीच सुचित केले आहे पण त्याचबरोबर ते शिवसेनेच्या घटनेचा या निकालासाठी आधार घेतील असे मत प्रख्यात कायदे तज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.Shivsena constitution important in mla disqualification issue



हा निकाल कसा असणार ? या निकालात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार ? दहाव्या अनुसूचीची व्याख्या अध्यक्ष कशी करणार??, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत, असे निकम यांनी स्पष्ट केले.

उज्ज्वल निकम म्हणाले :

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात वेगवेगळे निकाल येऊ शकतात. आयाराम-गयाराम थांबवण्यासाठी आणि दहावी अनुसूची बळकट करण्यासाठी या निकालाचे महत्त्व आहे व्हीपचा मुद्दा देखील महत्वाचा ठरू शकतो कारण सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा व्हिप मान्य केला आहे. यामुळे सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवडीच्या वेळी जो व्हिप काढला त्यावेळी त्या व्हिपची अवहेलना झाली का??, याचा निकालात समावेश असण्याची शक्यता आहे.

निकाल असणार दोन भाग

१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा महत्वाचा आहे. यासंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक झाली होती. त्यावेळी हे १६ आमदार उपस्थित नव्हते. मग ते अपात्र आहे का?? त्यावर अध्यक्ष काय निर्णय देतात, हे पाहावे लागणार आहे. या निकालाने भविष्यात दूरगामी परिणाम दिसणार आहे. दहावी अनुसूची पक्षांतरात आयाराम गयाराम थांबवण्यासाठी करण्यात आले होते. त्याचा कसा संदर्भ या निकालात येईल, ते महत्वाचे ठरणार आहे. आज पूर्ण निकाल येणार नाही. पूर्ण निकालास वेळ लागणार आहे. परंतु आजच्या निकालात कोण जिंकले आणि कोण हरले, हे स्पष्ट होणार आहे.

कुछ खूशी कुछ गम

सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने राज्यातील सत्ताकारणाचा निकाल देताना विधिमंडळाचा पूर्ण आदर राखला. आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिला. त्यानंतर अध्यक्षांकडे सुनावणी झाली. व्हिपचा नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे का?? हे पाहावे लागणार आहे. कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाचे अध्यक्ष पालन करणार का??, हे महत्वाचे आहे. सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभू यांचा व्हिप ग्राह्य धरला. परंतु राजकीय पक्ष कोणाकडे होता, हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना दिले. तसेच आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात भाष्य केले नाही. तो निर्णय अध्यक्षांकडे सोपवला. यामुळे हा निकाल म्हणजे कुछ खूशी कुछ गम, असा असणार आहे.

हे तीन मुद्दे महत्वाचे

खरा पक्ष कोणाचा??, व्हिप कोणाचा वैध?? आणि पक्षांतर बंदी कायदा या तीन मुद्यांवर निकालातून स्पष्टता येणार आहे. अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची घटना मागवली होती. म्हणजे शिवसेनेची घटना प्रत्यक्ष निकाल देताना अध्यक्ष लक्षात घेतील, असे दिसून येत आहे.

Shivsena constitution important in mla disqualification issue

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात