Shivbhojan thali : कोरोना काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यातील गरीब आणि गरजूंसाठी 15 एप्रिलपासून शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. तथापि, राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे. 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी पुन्हा 10 रुपयांना मिळणार आहे. Shivbhojan thali will not be available for free from October 1 it will be available for Rs 10
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे. यामुळे राज्य शासनाने विविध निर्बंधही शिथिल केले आहेत. कोरोना काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यातील गरीब आणि गरजूंसाठी 15 एप्रिलपासून शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. तथापि, राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे. 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी पुन्हा 10 रुपयांना मिळणार आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात हातावर पोट असलेल्या हजारो लाखो कष्टकऱ्यांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला. कोरोनामुळे ही थाळी मोफत होती. आता 30 सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल, 1 ऑक्टोबरपासून ही थाळी पूर्वीप्रमाणे 10 रुपयांना मिळणार आहे. तसा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे.
राज्यात दिनांक 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. 15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतलाय. या थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅम भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण या पदार्थांचा समावेश आहे.
Shivbhojan thali will not be available for free from October 1 it will be available for Rs 10
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App