प्रतिनिधी
मुंबई : प्रख्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टक प्रचंड गाजत असताना त्यांनी आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रकल्पाचा माणस बोलून दाखवला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे त्रिदल सादर करण्याचा त्यांचा मानस आहे.Shivaji – Savarkar: Digpal Lanjekar’s Savarkar Tridal after Shivraj Ashtak !!
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करुन जो पराक्रम गाजवला त्या पराक्रमाची गाथा सांगणारा शेर शिवराज हा सिनेमा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज अष्टकाप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित तीन चित्रपट जागतिक स्तरावर करण्याचा मानस असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्रिदल
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा माझे दैवत आहेत. त्यामुळे श्रीशिवराज अष्टकाप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्रिदल माझ्या मनात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडन, अंदमान आणि रत्नागिरी या ठिकाणी केलेले कार्य फार मोठे आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य 3 चित्रपटांच्या माध्यमातून समोर आणण्याची माझी इच्छा आहे. हे चित्रपट जागतिक पातळीवर नेण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे स्वप्न आम्ही सर्वांनी मिळून पाहिले असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
आराध्य दैवतांचे ‘अष्टक’
आपली जी आराध्य दैवतं आहेत त्यांच्याबद्दल आपल्या संतांनी अष्टके लिहून ठेवली आहेत. त्यामधून त्या दैवताची स्तुती करण्यात आली आहे. त्याच स्वरुपाचे अष्टक आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारे हे श्रीशिवराज अष्टक आहे. आठ चित्रपटांच्या या मालिकेतून महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग आणि घटना लोकांसमोर मांडण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे, असेही दिग्पाल लांजेकर यांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App