वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेनेचे नगरसेवक आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाची छापेमारी रविवारीही सुरु आहे. त्यांच्याकडून २ कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यांनी सुमारे १०० कोटींचा घोटाळा केल्याचे वृत्त आहे. Shiv Sena’s Yashwant Jadhav and MLA Yamini Yashwant Jadhav’s scam of Rs 100 crore; Income tax department Raids continue; 2 crore confiscated
जाधव यांचे निकटवर्तीय विमल अग्रवाल आणि मुंबई महापालिकेचे ५ कंत्राटदार आणि यशवंत जाधव कुटुंबीयांच्या ३३ जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाचे छापासत्र गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहे. त्यांची १० बँक लॉकर अधिकाऱ्यांनी सील केली आहेत. त्यांचे निकटवर्तीय विमल अग्रवाल आणि मुंबई महापालिकेचे ५ कंत्राटदार आणि यशवंत जाधव कुटुंबीयांच्या ३३ जागांवर छापे रविवारी देखील धाडी सुरू आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
मुंबईचे माजी पोलिस महासंचालक परम बीर सिंह यांनी खंडणी मागितल्याची फिर्याद दिल्यानंतर चौकशीची चक्रे फिरली होती. त्यात जाधव यांनी मोठा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले होते. प्राप्तिकर विभागाने तपासात अनेक पुरावे गोळा केले आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांना मोठे आर्थिक प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यांनी दरवर्षी १२ हजार कोटींचे प्रस्ताव नागरी कामासाठी मंजूर केले आहेत. कंत्रातदारांकडून बेकायदा माया जमवून कर बुडविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढू लागल्याने त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेची सत्ता गेली दोन दशके पालिकेवर आहे. ऐन महापालिकेच्या तोंडावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडा केला आहे.
यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि भायकळा येथील आमदार यामिनी जाधव यांची गेल्या वर्षी चौकशी करण्यात आली होती. २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्याबाबत अधिकाऱ्यांना संशय आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App