धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती; शेती उत्पादन निर्यातीसाठी तरतूद; एअर इंडियाची इमारत घेणार विकत, बारामतीत पोलिस श्वान प्रशिक्षण केंद्र!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महायुतीने ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रासाठी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यात धनगर समाजाच्या उन्नती करता योजना, शेती उत्पादन निर्यातीसाठी मोठी तरतूद, मुंबईतली एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणे आणि बारामती पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणे आदी निर्णयांचा समावेश आहे. shinde fadnavis govt decisions

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले :

  •  धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती.
  •  राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता.
  •  मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.
  •  अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार.
  •  मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.
  •  गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार.
  •  विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकांना मोठा फायदा.
  •  मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार.
  •  बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार.
  •  महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार.
  •  नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ.

shinde fadnavis govt decisions

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात