सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थिर, तरी संजय राऊत म्हणतात, ते तीन महिन्यात पडेल!!

प्रतिनिधी

मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निकाल अनुकूल लागला. शिंदे – फडणवीस सरकार स्थिर झाले तरी संजय राऊत यांची भविष्यवाणी करण्याची हौस काही थांबलेली नाही. त्यांनी शिंदे – फडणवीस सरकार तीन महिन्यांनी कोसळले, असे नवे भाकीत केले आहे. Shinde-Fadnavis government stable after Supreme Court decision

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी हे सरकार तीन महिन्यात जाणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.



नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

राज्यातील हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं शिंदे – फडणवीसांना उघडं पाडलं आहे. फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करू शकत नाही हे न्यायालयानं सांगितलं आहे. मग तुम्ही कसले पेढे वाटताय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचे राऊत म्हणाले.

तसेच अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत, आदेश पाळाल तर अडचणीत याल. त्यांचे सर्व आदेश बेकायदेशीर आहेत असे राऊत म्हणाले. आम्ही सत्तेसाठी भुकेलो नाही. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंचे काहीही चुकले नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

Shinde-Fadnavis government stable after Supreme Court decision

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात