ठाकरे – पवारांना शिंदे – फडणवीस सरकारचा पुन्हा दणका; वॉर्ड पुनर्रचना रद्द!! 2017 नुसारच सर्व महापालिका निवडणूका!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारने महापालिका निवडणुकांसाठी वाढवलेली वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. यातून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या आणखी एका निर्णयाला आता शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दणका दिला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई, ठाण्यात बसणार आहे, तर पवारांना पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये बसणार आहे. Shinde – Fadnavis government hits Thackeray – Pawar again Ward reorganization cancelled

ठाकरे – पवारांना बसणार फटका

आगामी महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करणअयात आलेली वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 2017 च्या वॉर्ड रचनेनुसारच या निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वॉर्ड पुनर्रचना करत वॉर्डची संख्या वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. हा निर्णय आता रद्द करण्यात आल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील सदस्यसंख्या २३६ वरुन २२७ इतकी म्हणजे 2017 प्रमाणे होणार आहे.



इतर महापालिकांसाठी वॉर्ड रचना

३ लाखांपेक्षा अधिक आणि ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ६५, तर कमाल संख्या ८५ असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

  •  ६ लाखांपेक्षा अधिक आणि १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल.
  •  ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  •  १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  •  २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
  •  ३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल.
  •  २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.

Shinde – Fadnavis government hits Thackeray – Pawar again Ward reorganization cancelled

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात