प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोपही शीतल म्हात्रे यांनी केला. आता याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्वीट करत थेट युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंवर निशाणा साधला आहे. Shinde faction Shivsena targets Thackeray faction over morphed video of Sheetal mhatre
नरेश म्हस्के यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, किती खाली पडाल रे…..नीच हरकती कराल रे… जाणीव नावाची, संस्कारांची, इतिहासाची ठेवाल रे??? माता भगिनी विश्वासावर काम करायला येतात रे, सगळं सांभाळून राजकारणात आपले पाय रोवतात रे… आव्हानांना तोंड देत, यशाचे झेंडे गाडतात रे, त्यांनाच महिला दिनाच्या, शुभेच्छा तुम्ही देता ना रे??
किती खाली पडाल रे…..नीच हरकती कराल रे… जाणीव नावाची , संस्कारांची, इतिहासाची ठेवाल रे??? माता भगिनी विश्वासावर काम करायला येतात रे सगळं सांभाळून राजकारणात आपले पाय रोवतात रे… आव्हानांना तोंड देत, यशाचे झेंडे गाडतात रे त्यांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही देता… — Naresh Mhaske (@nareshmhaske) March 12, 2023
किती खाली पडाल रे…..नीच हरकती कराल रे…
जाणीव नावाची , संस्कारांची, इतिहासाची ठेवाल रे???
माता भगिनी विश्वासावर काम करायला येतात रे
सगळं सांभाळून राजकारणात आपले पाय रोवतात रे…
आव्हानांना तोंड देत, यशाचे झेंडे गाडतात रे
त्यांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही देता…
— Naresh Mhaske (@nareshmhaske) March 12, 2023
त्यांच्याच चारित्र्यावर मग शिंतोडे उडवता रे?? मातोश्री नावाच्या पेजवरुन, औरंगी हरकती करता रे?? नाव, पत घालवलीतच, कुठे फेडाल ही पापं रे… असे म्हणत नरेश म्हस्केंनी थेट वरुण सरदेसाईंना या ट्विटमध्ये टॅग केले आहे. त्यामुळे हे ट्विट पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या जात आहे. तसेच हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App