करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे.
आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करूणा धनंजय मुंडे ह्या परत आल्या आहेत .म्हणजे परत फोकस मध्ये आल्या आहेत .आता त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे. आपली प्रेमकथा पुस्तक रुपात प्रकाशित करणार असल्याचं करुणा यांनी फेसबुक पोस्टमधून जाहीर केलं . त्यामुळे करुणा यांच्या वैयक्तिक जीवनातील कुठल्या गोष्टी वाचायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. SHE IS BACK WITH BOOK : Karuna Sharma announces to publish novel on Love Story with Dhananjay Munde
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचे आरोप झाले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना आपलं खासगी आयुष्य उलगडून सांगण्याची वेळ धनंजय मुंडेंवर आली होती. त्यावरुन उठलेल वादळ शांत होतो, न होतो, तोच पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट?
माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे.
‘वेळ येईल तेव्हा
गेली 25 वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या 2 महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा इशारा करुणा यांनी याआधीच दिला होता.
‘आमदारकीची निवडणूकही लढवणार’
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा इशाराही करुणा यांनी दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App