धनंजय मुंडे यांच्या लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मांही यायचेय राजकारणात, मुंबईत सामाजिक कार्य केले सुरू


धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर करुणा शर्माही आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईच्या महापौरांची भेट घेऊन नागरी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. Dhananjay Munde’s live-in partner Karuna Sharma planning to enter in politics, started doing social work in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर करुणा शर्माही आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईच्या महापौरांची भेट घेऊन नागरी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

शर्मा म्हणाल्या, मला आधी चांगली समाजसेवा करायची आहे. 25 वर्ष मी घरात होते. आता 2 ते 3 महिने झाले घराबाहेर पडले आहे. राजकारण अजून खूप लांब आहे. पण करावं लागलं तर नक्की करेन. मला लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचे आहे. स्वच्छतागृह आणि कचराप्रश्न घेऊन आज महापालिकेत आले होते. मी समाजसेविका आहे. राजकारणातही येईल. मला आमदारकीची निवडणूक लढवायची आहे.करुणा शर्मा यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडेही एक तक्रार केली आहे. सोशल मीडियावर खलिफा डॉट कॉमसारख्या अ‍ॅप्लिकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात, त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्याम्हणाल्या की, आम्ही आता निवेदन दिले आहे. सध्या इंटरनेटवर खूप वाईट व्हिडीओ वायरल होत आहेत. काही साईट या अश्लीलता पसरवतात. फेसबुकवर सुद्धा काही व्हिडीओ पॉप अप होतात. ते बंद व्हावं.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घडामोडींविषयी केस सुरु असल्याने बोलण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी पुराव्यासह बोलेन. पूजा चव्हाण असो किंवा इतर कोणतीही मुलगी तिला न्याय मिळाला पाहिजे. माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर मी सुद्धा आत्महत्या करणार होते. पण मरण्यापेक्षा मी लढणे पसंत केलं. माझ्या मुद्यावर पण मी लवकरच बोलणार आहे. त्याचा निकाल लागला की मी बोलणार आहे. 100 टक्के सगळ्या गोष्टी सांगेन आणि पूर्ण पुराव्यासह सांगेन. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

इथून पुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे सांगून करुणा शर्मा यांनी म्हणाल्या, पूजा चव्हाण असेल किंवा आज नवी मुंबईतील एका मुलीला मारुन टाकल्याचा मुद्दा आहे. काही बाबी मीडियासमोर येत नाहीत, अशा महिलांची परिस्थिती खूप वाईट आहे. मी स्वत: पण आत्महत्या करणार होते. पण मग मी विचार केला की असंच मरण्यापेक्षा लोकांसाठी काही तरी करुन मरु. मी लोकांना पण न्याय मिळवून देईन आणि स्वत:साठी पण न्याय मिळवण्यासाठी मी लढणार आहे.

Dhananjay Munde’s live-in partner Karuna Sharma planning to enter in politics, started doing social work in Mumbai

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती