आमने-सामने: इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षावरून कंगना रनौत आणि इरफान पठाण भिडले , कंगनाने करून दिली बंगालमधील हिंसाचाराची आठवण!


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने बंगाल हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले आणि तीचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले होते, असे असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली आहे. आता आपले विचार शेअर करण्यासाठी कंगनाने इन्स्टाग्रामचा आधार घेतला आहे. 


पंगा गर्ल बोलते ते खरं असतं मात्र ते सगळ्यांनाच टोचत .यामुळेच की का आता इंस्टाग्रामनेही कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे. Face-to-face: Kangana Ranaut and Irfan Pathan clash over Israeli-Palestinian conflict, Kangana recalls violence in Bengal!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद टोकाला गेला त्याचे रुपांतर हिंसेत झाले आहे. त्यावर बॉलीवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटिंनी प्रतिक्रिया व्यक्त केली. स्वतःच्या देशातील हिंसाचारावर गप्प बसणारे पॅलेस्टाईनबद्दल सहानुभूति व्यक्त करत आहेत .त्यावर कंगणानेही आपली भूमिका मांडली व इरफान पठाणला चांगलेच सुनावले .

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वादात इरफान पठाणनं पॅलेस्टाईनचे समर्थन केले. त्यानं लिहिलं आहे की, ‘जर तुमच्यात थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक असेल तर तुम्ही पॅलेस्टाईनच्या विरोधात काहीही लिहिणार नाही’.

इरफान पठाण आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात यानिमित्ताने वाकयुद्ध सुरू झालेले आहे. पॅलेस्टाईनच्या मुद्यावर सोशल मीडियावर हे ‘समोरासमोर’ आले आहेत. मंगळवारी इरफानने ट्वीटद्वारे ‘#PrayforPalestine’ पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शविला.

कंगनाने तिची प्रतिक्रिया देण्यासाठी इंस्टाग्राम स्टोरीचा आधार घेत आमदार दिनेश चौधरी यांचे ट्विट शेअर केले आहे.कंगनाने लिहीले , “इरफान पठाण यांचे दुसर्‍या देशाबद्दल इतके प्रेम आहे, पण त्यांच्याच देशातील बंगालमधील हिंसाचारावर ट्विट करू शकले नाही.”

केराकतचे भाजप आमदार दिनेश चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘इरफान पठाण यांना इतर देशाबद्दल इतके प्रेम आहे, पण त्यांना आपल्याच देशातील बंगालवर ट्विट करता आले नाही.’

काय म्हणाले कंगना

“कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादापासून आपल्या लोकांना आणि लोकांना संरक्षण देणे हा प्रत्येक देशाचा मूलभूत अधिकार आहे. भारत इस्त्राईलच्या पाठीशी उभा आहे. ज्यांना असे वाटते की दहशतवादाचा निषेध करुन प्रत्युत्तर देता येते त्यांनी इस्राईलकडून शिकले पाहिजे.ते दहशतवाद पसरवतील. जर तुम्ही ठामपणे उत्तर दिले तर ते रडतील आणि अत्याचार झाल्याचा आव आनतील. आपण फक्त निषेध केल्यास ते आपल्या संसद आणि पंचतारांकित हॉटेल्सवर हल्ला करतील. आपल्यासाठी हा कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद आहे. ”

Face-to-face : Kangana Ranaut and Irfan Pathan clash over Israeli-Palestinian conflict, Kangana recalls violence in Bengal!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात