विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खरी राष्ट्रवादी कोणाची??, या वादात निवडणूक आयोगामध्ये अजित निष्ठांनी ते शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरच हल्लाबोल केला. शरद पवारांनी 558 प्रतिनिधी परस्पर निवडून ते स्वतःच अध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार त्यांची निवडच झालेली नाही, असा युक्तिवाद अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे वकील महेश जेठमालांनी यांनी निवडणूक आयोगात केला. अजितनिष्ठ राष्ट्रवादीने एकापाठोपाठ एक आरोपांच्या तोफा शरद पवारांवरच डागल्या. Sharad pawar’s presidential election unlawful, claims ajit pawar’s NCP in election commission
शरद पवार पक्षाची घटना मानतच नाही. ते मनमानी करतात. याची उदाहरणे अजित निष्ठांनी निवडणूक आयोगात मांडली.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत 10 आणि 11 2022 मध्ये बैठक झाली, पण त्याची सगळी मिनिट्स 1 सप्टेंबर 2022 रोजीच ठरली होती. त्यामुळे 11 तारखेला शरद पवारांची अध्यक्षपदी निवड फक्त औपचारिकताच उरली होती. राष्ट्रवादीच्या 588 कार्यकारणी सदस्यांची नियुक्ती शरद पवारांनी परस्पर आपल्या एका सहीने केली. त्यापैकी 558 प्रतिनिधींनी अर्थात डेलिगेट्सनी त्यांची अध्यक्षपदी निवड केली. हे 558 प्रतिनिधी देखील शरद पवारांनी परस्परच निवडले होते. यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची घटना पाळली नाही. त्यांची अध्यक्षपदी निवड पक्षांतर्गत लोकशाही मार्गाने झालीच नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदाच ठरतात, असा युक्तिवाद अजितनिष्ठांनी केला.
या उलट अजित पवारांची पक्षाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही 30 जून 2023 रोजी झाली आणि त्याच दिवशी निवडणूक आयोगाला निवड झाल्याचे अधिकृतरित्या कळविलेही होते, असे अजितनिष्ठांच्या वकिलांनी निवडणूक आयोगाला सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाने आधीच निवडणूक परफॉर्मन्सच्या आधारे काढून घेतली त्यामुळे आता आमदार खासदारांची संख्या हाच खरा पक्ष कोणाचा हे ठरविण्यासाठी एकमेव निकष उरतो त्यानुसार नागालँड आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांचे धरून आमच्याकडे 55 आमदार आहेत आणि 2 खासदार आहेत, असा युक्तिवादही अजितनिष्ठांनी निवडणूक आयोगात केला.
निवडणूक आयोगातली पुढची सुनावणी आता सोमवारी होणार असून त्या दिवशी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निवडणूक आयोग अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App