विशेष प्रतिनिधी
पुणे : लोकांसमोर एकमेकांची जिरवा जिरवी, पण सत्तेच्या वळसणीला जाण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काका – पुतण्यांच्या गटांमध्ये साखर पेरणी!! असला प्रकार दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. कारण या इन्स्टिट्यूट मध्ये पवारांच्याच अखंड किंवा फुटलेल्या पक्षाचे वर्चस्व आहे. ते अद्याप भाजपला मोडून काढता आलेले नाही. किंवा त्यांनी मोडून काढलेले नाही.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाबासाहेब पाटील, राजेश टोपे, विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, बबनदादा शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, नरेंद्र घुले, अशोक पवार विश्वजीत कदम आदी नेते जमले होते.
हे सगळे नेते विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात तोफा डागत होते. एकमेकांच्या जिरवा जिरवीची भाषा करत होते. मात्र, यापैकी अजित पवारांचा पक्ष भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आधीच येऊन बसला होता. ती सत्तेची वळचण कायम राहिली. आता त्या वळचणीला येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते उतावीळ झाले असून अनेकांनी या संदर्भात अजितदादांची मनधरणी करण्याच्या बातम्या समोर आल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधल्या बैठकीचे निमित्त या सगळ्याला मिळाले. शरद पवारांचे भाषण सुरू असताना हे सगळे नेते एकमेकांशी चर्चा करण्यात, हास्यविनोद करण्यात रममाण झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App