नाशिक : संजय राऊतांनी सूचक ट्विट करून शरद पवार महाराष्ट्रात फिरणार असल्याची माहिती दिली. पण त्यामुळेच पवार महाराष्ट्रात फिरून करणार काय??, हा सवाल समोर आला.Sharad Pawar will travel across Maharashtra
आजारपणामुळे घरीच असलेल्या शरद पवारांचे संजय राऊत यांनी सिल्वर ओक वर जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी सूचक पद्धतीने ट्विट केले. या माणसाची तयारी थक्क करणारी आहे. शरद पवार महाराष्ट्रात फिरणार आहेत, असे त्यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले. त्यामुळेच शरद पवार इथून पुढे महाराष्ट्रात फिरून नेमके करणार काय??, असा सवाल समोर आला.
– राष्ट्रवादीवर कब्जा करायची संधी हुकली
अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुरू केलेला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा प्रयत्न फसला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस वर आयता कब्जा करण्याची शरद पवारांची संधी हुकली. अन्यथा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर कब्जा करायचा स्वतःची भीष्म पितामह म्हणून पक्षांमध्ये प्रस्थापना करायची आणि अखंड राष्ट्रवादीची सगळी सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हातात द्यायची, हा “डाव” शरद पवारांच्या गोटाने आखला होता. पण यातून अजित पवारांचे अख्खे कुटुंब राजकीय दृष्ट्या वगळले गेले असते. हा धोका ओळखूनच भाजप, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी वेळीच “डाव” टाकून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी सूत्रे सुनेत्रा पवारांच्या हातात दिली.
आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली,मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली!अनेक विषयांवर चर्चा झाली!राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे या माणसाची खरंच कमाल आहे! — Sanjay Raut (@rautsanjay61) April 1, 2026
आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली,मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली!अनेक विषयांवर चर्चा झाली!राज्यात फिरण्याची तयारी सुरू आहे या माणसाची खरंच कमाल आहे!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 1, 2026
– शरद पवारांच्या गोटाचा चडफडाट
त्यामुळे शरद पवारांच्या गोटाचा चडफडाट झाला. रोहित पवार यांनी तब्बल दोन महिने आदळ आपट केली. पण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण घडून येऊ शकले नाही. खुद्द शरद पवारांना सुद्धा त्यात यश येऊ शकले नाही. शेवटी भाजपच्या, विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डावपेचाचा आधार घेऊन शरद पवारांना राज्यसभेची स्वतःची सीट राखावी लागली. शरद पवारांच्या राज्यसभा सीटचे सगळे कॅंन्व्हसिंग संजय राऊत यांनी केले. याच दरम्यान शरद पवार आजारी पडल्याने हे दोनदा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
– सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला सुरुंग
पण आता ते बरे झाल्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओक वर जाऊन भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात फिरायचा निर्णय घेतल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले. मग आता शरद पवार महाराष्ट्रात फिरून स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढवणार की दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी वेगळ्या पद्धतीने रेटा लावणार??, हा सवाल या निमित्ताने समोर आला. कारण कुठलाच “डाव” सरळपणाने टाकण्याचा शरद पवारांचा लौकिक नाही. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रात फिरणार म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी खोडा घालणार किंवा तसा खोडा घालणे जमले नाही, तर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आतून आणि बाहेरून सुरुंग लावायचा डाव खेळणार, याची चर्चा महाराष्ट्रात रंगल्यास त्यात आश्चर्य काही नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App