Gopichand Padalkar : 100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला, गोपीचंद पडळकरांची टीका

Gopichand Padalkar

विशेष प्रतिनिधी

माळशिरस : Gopichand Padalkar महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.Gopichand Padalkar

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात गोपीचंद पडळकर बोलत होते. ते म्हणाले, नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कशा होतात त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे.



पडळकर म्हणाले, समोर आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही चुकीचा पायंडा पाडता आहात. हे सरंजामशाही मोहिते पाटील स्वतःला राजे मानतात. मी बारामतीत उभा होतो तेव्हा माझे डिपॉजिट जप्त झाले. मग जरा ईव्हीएम घोळ असता तर मी पराभूत झालो असतो का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 हजार मतांनी पराभव झाला. मात्र त्यावेळी 72 हजार मतं बाद झाली होती. जो राहुलबाबा इथे येणार आहे. त्याच्या मामाच्या गावात पण ईव्ही एमवर मतदान होतंय. जाऊन मामाच्या गावाला जाऊन बघ एकदा.

जयंतराव पाटील हे सांगतात की, भाजपने 50 हजार मते आधीच सेट केले. त्यामुळे माझा विजय हा 61 हजार मतांनी झालाय पण प्रत्यक्षात ते 11 मतांनी जिंकले आहेत. शरद पवारांना मारकडवाडीचे आकर्षण का वाटतेय? कारण या देशातील जनता 2029 ला मोदींना पंतप्रधान करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षे मुख्यमंत्री केले हे यांचे दुखणे आहे, असं पडळकर म्हणाले.

Sharad Pawar was born after the death of 100 Shakuni, Gopichand Padalkar criticizes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात