पवारांचा भाजपला पुन्हा एकदा गंडवायचाच प्लॅन होता, पण अमित शाहांनी तो कसा उधळला??; अजितदादांनी सांगितली अंदर की बात!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवारांचा 2019 प्रमाणेच भाजपला पुन्हा एकदा गंडवायचाच प्लॅन होता. पण 2022 मध्ये उद्धव ठाकरे सरकार कोसळताना अमित शाहांनी पवारांचा प्लॅन बरोबर ओळखला आणि आपली चाल खेळून तो हाणून पाडला, अशा आशयात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अंदर की बात सांगितली. Sharad pawar wanted to cheat and ditch BJP again, but amit Shah destroyed his plan; ajit pawar told the story

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी पवारांच्या प्लॅन विषयी बरेच खुलासे केले.

अजित पवार म्हणाले :

उद्धव ठाकरेंचे सरकार जात होते, तेव्हा राष्ट्रवादीने सरकारमध्ये सामील व्हावे याकरता अनेक आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिले होते, यामध्ये जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता.

ज्यावेळी उद्धवजींचे सरकार जात होते, त्यावेळी माझे सर्व सहकारी माझ्या चेंबरमध्ये मंत्रालयात जमले. सर्व विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनी पत्र लिहून आपण सरकारमध्ये गेले पाहिजे, अशी मागणी केली. या पत्रावर जयंत पाटील, अशोक पवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तानपुरे, राजेश टोपे यांच्या देखील सह्या होत्या. राजेश टोपेच तिथे पत्र घेऊन गेले होते. लोकं कामाकरता निवडून देतात, विकास व्हावा म्हणून निवडून देतात. आम्हाला सरकारमध्ये जायचे आहे, असे सगळ्यांनीच त्या पत्रात स्पष्ट म्हटले होते.



हे पत्र पाहिल्यानंतर शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना आणि जयंत पाटलांना अमित शाहांशी चर्चा करायला सांगितले होते. चर्चेकरता आम्ही निघालोही होतो. पण नंतर साहेबांनी सांगितले की तुम्ही तिथे जाऊ नका, इथूनच फोनवर चर्चा करा. परंतु, अमित शाह म्हणाले की असं होत नाही, आपण एकत्र सरकार बनवयाला आपण निघालो आहोत. तुमचा मागचा अनुभव चांगला नाही, मागे तुम्ही अनेकदा आमच्याबरोबर यायचे ठरवले होते, अनेकदा तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला, पण तुमची भूमिका ठाम नसते. तुमची फोनवर बोलण्यासारखी विश्वासार्हता नाही. पण साहेबांनी सांगितलं की इथूनच बोलायचं. पण अमित शाह म्हणाले की, मी फोनवर बोलणार नाही. फोनवर इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची नसते. यामुळेच शरद पवारांची भाजपाबरोबर युती होऊ शकली नाही. परिणामी नंतर राष्ट्रवादीत फूट पडली.

शरद पवारांनी प्रस्ताव ठेवला होता

2014 मध्ये भाजपच्या सरकारला राष्ट्रवादीने भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. तर, 2017 ला भाजपात येण्यासाठी प्रयत्न सुरू होते, याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, शिवसेनेला महायुतीतून बाहेर काढून राष्ट्रवादीने महायुतीत येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आमच्या वरिष्ठांनीच हा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही कधीच केंद्रातील लोकांशी बोललो नाही. फक्त वरिष्ठ आणि प्रफुल्ल पटेल बोलायचे. पण तेव्हा सुद्धा शरद पवारांनी आयत्या वेळेलाच माघार घेतली म्हणूनच अमित शाह म्हणाले, राष्ट्रवादीची भूमिका ठाम आणि विश्वासार्ह नसते. अमित शाह यांना राष्ट्रवादीचा तो कटू अनुभव आला होता.

Sharad pawar wanted to cheat and ditch BJP again, but amit Shah destroyed his plan; ajit pawar told the story

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात