मी त्यांची अटक टाळली; “लहान” माणसांना प्रत्युत्तर न देणाऱ्या पवारांचे “तेलगी” विषयावर भुजबळांना प्रत्युत्तर!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचे वक्तव्य आल्यानंतर, मी लहान माणसांच्या वक्तव्यांना उत्तरे देत नाही, असे नेहमी म्हणणाऱ्या शरद पवारांनी छगन भुजबळ यांनी तेलगीचा विषय काढताच मात्र त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.Sharad pawar usually dines to answer “smaller” ones but he replied on telgi issue to chagan bhujbal

बीडमध्ये अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी तेलगीच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर तोफा डागल्यानंतर पवारांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले आहे त्यांचा राजीनामा घेतला नसता तर त्यांना अटक झाली असती. ती अटक मी टाळली, असा दावा पवारांनी केला आहे.



बीडच्या सभेत अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्र सोडले होते. माझी काहीही चूक नसताना, २००३ मध्ये तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रकरणात शरद पवारांनी माझा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला, असा गंभीर आरोप केला होता. त्या आरोपाला शरद पवार यांनी उत्तर दिले.

एरवी महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याने कुठलीही वक्तव्य केले तरी आपण लहान माणसांच्या वक्तव्यांना महत्त्व देत नाही. त्यांना उत्तरे देत नाही, असे शरद पवार नेहमी म्हणत असतात. पण भुजबळ यांनी तेलगी स्टॅम्प घोटाळ्याचा विषय काढताच त्यांना उत्तर द्यायला मात्र शरद पवार पुढे आले यातच त्या मुद्द्याचे “वेगळेपण” आहे.

छगन भुजबळांचा राजीनामा घेतला नसता तर त्यांना अटक झाली असती. मी त्यांना अटकेपासून वाचविले अशा आशयाचे वक्तव्य शरद पवारांनी केले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ही बातमी दिली आहे.

छगन भुजबळांचा नी नेमका आरोप काय?

बीडमध्ये शरद पवारांना उद्देशून केलेल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले, “मी पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष झालो. तेव्हा तुम्ही आणि मीच महाराष्ट्रात दोघेच फिरत होतो. थोडे आमदार कमी पडले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री, तर मी उपमुख्यमंत्री झालो. पण, मला एक कळलं नाही, २३ डिसेंबर २००३ रोजी माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा तुम्ही घेतला. त्यात माझी काय चूक होती?”

स्टॅम्प घोटाळा प्रकरणात अब्दुल करीम तेलगीला अटक करत त्याच्यावर “मोक्का” लावण्याचे आदेश मी दिले. तेव्हा तुम्ही मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. राजीनामा द्या, असं तुम्ही म्हटलं. नंतर झी नेटवर्कच्या सुभाष गोयल यांचा फोन आला. भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. तरीही तुम्ही माझा राजीनामा घेतला. १९९२-९३ आणि ९४ मध्ये गो. रा. खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते. पण तुमचा राजीनामा कुणीही मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला??” असा संतप्त प्रश्न भुजबळांनी पवारांना विचारला होता.

त्यावर पवारांनी भुजबळांचा राजीनामा घेतला नसता, तर त्यांना अटक झाली असती. त्यांचा राजीनामा घेऊन मी त्यांच्या अटक टाळली, असा दावा केला आहे.

Sharad pawar usually dines to answer “smaller” ones but he replied on telgi issue to chagan bhujbal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात