प्रतिनिधी
नाशिक : मागच्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळामध्ये शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या प्रशांत पाटील या तरुणास नवी मुंबई येथून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. छगन भुजबळ यांना या तरुणाने धमकी दिली होती. त्यानंतर भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.Youth Arrested From Navi Mumbai For Threatning Chhagan Bhujbal On Phone
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री भुजबळ यांना मोबाइलवर एक फोन आला होता. त्यात तुमची मी सुपारी घेतली असून जीवे मारण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कल्पना देण्याची माझी पद्धत आहे, असे सांगत भुजबळ यांना धमकवण्यात आले. त्यांनी तातडीने पुणे पोलिस तसेच सीआयडीला या संदर्भामध्ये कळवले. त्यानंतर वेगाने तपासाची चक्रे फिरवून संबंधित तरुणाला नवी मुंबईतून अटक करण्यात आली.
संशयित कोल्हापुरातून रातोरात नवी मुंबईत
प्राथमिक तपासात हा युवक एका खासगी ठिकाणी नोकरीला असून त्याने भुजबळ यांचा मोबाईल क्रमांक गुगलवर सर्च करून मिळवला असे निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर येथून तो रातोरात नवी मुंबई येथे कसा पोहोचला याचाही तपास पोलीस पुढे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App