विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : भाजपचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विशिष्ट वक्तव्यांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्यानंतर आज शरद पवारांनी राणे पुत्रांना चिपळूणच्या जाहीर सभेत ठोकून काढले, पण राणे पुत्रांना ठोकताना त्यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्या विनम्रतेची भलामण केली. Sharad pawar targets Rane sons!!
18 वर्षांनंतर शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला, त्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी काही वक्तव्य केले होते. ते वक्तव्य प्रक्षोभक असल्याचा दावा करून शरद पवारांनी समाचार घेतला.
Narendra Modi : न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधानांनी दिला अबकी बार-मोदी सरकारचा नारा; भारताला तिसरी सर्वात मोठी इकॉनॉमी बनवणार
शरद पवार म्हणाले :
सत्ता येते आणि जाते. तेव्हा संयम ठेवायचा असतो. सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचा असतो. आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते. काम करत राहायचं असतं.
रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहिती नाही. हा जुना जिल्हा आहे. या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. आणि अलिकडे मी बघतो. मीही मुख्यमंत्री होतो. माझ्या घरात एक मुलगी आहे. देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी तिचा लौकीक आहे. विनम्रपणा हे तिचे वैशिष्ट्य आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला. त्यांनी माझ्यासोबत काम केलंय. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या “अशा” प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा, ही कशा प्रकराची भाषा आहे??
भारत हे राष्ट्र सर्व धर्मीयांचं आहे. इथे हिंदू, सीख आणि मुस्लिम आहेत. आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीने जाहीर वाक्य करतात त्यांना आवर घातला जात नाही. उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली जाते याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे. जेव्हा सत्ता डोक्यात जाते, तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App