भाजपवर टीका करण्यापेक्षा पवारांनी त्यांचे साथीदार का सोडून गेले ? याचं आत्मपरीक्षण करावं – दरेकर

बावनकुळेंना  पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी राज्याचं नेतृत्व देऊन प्रदेशाध्यक्ष केलं, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन जिंकणार असल्याचा दावा केल्याबरोबर शरद पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची “लायकी” काढली. ज्या नेत्याला त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट द्यायलाही “लायक” समजले नाही, त्या नेत्याविषयी आपण बोलायची काय गरज आहे??, अशा शब्दांत शरद पवारांनी बावनकुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता भाजपाकडूनही शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना आत्मपरीक्षण करण्यास सांगितले आहे. Sharad Pawar should examine himself instead of criticizing BJP  Darekar

प्रवीण  दरेकर म्हणाले, ” शरद पवार यांनी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी. भाजपवर टीका करण्यापेक्षा पवारांनी त्यांचे साथीदार का सोडून गेले ? याचं आत्मपरीक्षण करावं. चंद्रशेखर बावनकुळे पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरून जनतेत जात आहेत.”

याचबरोबर ”शरद पवारांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका करू नये. त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी राज्याचं नेतृत्व देऊन प्रदेशाध्यक्ष केलं. ते पक्ष विस्तार करत आहेत, पायाला भिंगरी लावून  महारष्ट्रभर फिरत आहेत आणि त्यांनी एक नेतृत्व  प्रस्थापित केलं आहे. मला वाटतं शरद पवारांनी आमच्या पक्षाची किंबहून बावनकुळेंची  चिंता करू  नये, तर अजित पवारांसोबत ९० टक्के पक्ष गेला त्याचा विचार करावा.” असं दरेकर म्हणाले.

याशिवाय, ”छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ सहकारी आपल्याला का सोडून गेले, याचं आत्मपरीक्षण करा. आमच्या पक्षाच्या नेत्यांची नसती उठाठेव आपण करू  नये. स्वत:च्या पक्षाचा होत  असलेला ऱ्हास का होतोय, याबाबत आत्मपरीक्षण करून त्याची चिंता करावी.” अशा शब्दांमध्ये प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

Sharad Pawar should examine himself instead of criticizing BJP  Darekar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात