“ते” शक्य नाही!!; अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला शरद पवारांचा ब्रेक!!

प्रतिनिधी

नाशिक : अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या अनेकांची इच्छा असली तरी सध्या ते शक्य नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला आज नाशिकमधून ब्रेक लावला. Sharad Pawar says, it’s not possible to make ajit Pawar chief minister

सध्या राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदाएवढे संख्याबळ नाही. त्यामुळे कोणाची कितीही इच्छा असली तरी अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असे पवारांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीकडे संख्याबळ असते, तर बाकीच्या सर्व सहकाऱ्यांची चर्चा करून काही निर्णय बाकीच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून काही निर्णय घेता आले असते, अशी पुस्तीही शरद पवारांनी यावेळी जोडली.


UPA Sharad Pawar : जागाच खाली नाही तर शरद पवार यूपीएचे अध्यक्ष कसे होणार?; सुशीलकुमार शिंदेंचा खोचक सवाल!!


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एका जाहीर मेळाव्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आपण कामाला लागावे, असे आवाहन जाहीर मेळाव्यात केले होते.

दस्तुरखुद्द अजित पवारांनी देखील 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद सोडले. हा निर्णय चुकला, असे वक्तव्य एका मुलाखतीत केलेच होते. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा महाराष्ट्रभर सुरू असताना शरद पवारांनी संख्याबळाच्या अभावी ते शक्य नसल्याचे वक्तव्य करून या चर्चेला ब्रेक लावून कार्यकर्त्यांना देखील अशी चर्चा बंद करण्याचा इशारा दिल्याचे मानण्यात येत आहे.

Sharad Pawar says, it’s not possible to make ajit Pawar chief minister

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात