विशेष प्रतिनिधी
मुंबई : तीच ती ग्रेव्ही आणि त्याच ग्रेव्हीत बनवलेल्या डिशेस पासून हॉटेल रेस्टॉरंट मधल्या खवैय्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या मेन्यूतून मिलेट्सचे चमचमीत पदार्थ यापुढे मिळणार आहेत. Meals in the menu of hotels and restaurants will be served with glittering items made of millets.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअनुषंगाने हॉटेल, रेस्टॉरंटमधील मेन्यूमध्ये मिलेट्सचा अर्थात भरडधान्याचा समावेश करावा, असे आवाहन अन्न अणि औषध प्रशासन विभागाने केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे राज्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, कोडो, कुटकी, सावा, राळा आणि राजगिरा आदी पिकांचा समावेश आहे. ही सर्व पौष्टिक तृणधान्य लोह, कॅल्शिअम, झिंक, आयोडीन सारख्या सूक्ष्म पोषक घटकांने समृद्ध आहे, तसेच ग्लूटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्य डायरिया, बद्धकोष्टता आतड्याच्या आजारावर प्रतिबंध करतात. तसेच या तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, अॅनिमिया, उच्चरक्तदाबरोधक आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारीत पदार्थ कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यास सक्षम असल्याने आहारामध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मिलेट मंथ फेब्रुवारी ज्वारीसाठी राखीव
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे लोकांच्या आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक राज्यास एक विशिष्ट महिना नेमून दिला आहे. महाराष्ट्र राज्यासाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना नेमून दिला आहे. मिलेट ऑफ मंथनुसार फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित केला आहे.
तृणधान्याच्या उपयोगामुळे ग्राहकांना पौष्टिक अन्न पदार्थ उपलब्धता होऊ शकतील. ते निरोगी राहण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये तयार होणाऱ्या आणि विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये ज्वारी, बाजरी आणि इतर भरडधान्याचा उपयोग करावा, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App