Sharad Pawar : ठाकरेंच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता, पण मनातलाही मुख्यमंत्री जाहीर करायला पवारांचा नकार!!

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद खासदार शरद पवार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याच, पण मनातलाही मुख्यमंत्री जाहीर करायला आज नकार दिला. Sharad Pawar refusal to announce Chief Minister even in his mind

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत आतापासूनच विचार करण्याची गरज नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी पुन्हा एकदा सांगितले. कोल्हापूर दौऱ्यात बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी तीच भूमिका मांडली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीतही सगळे एकत्र आले होते, निवडणुकीनंतर मोरारजी देसाई यांचे नाव पुढे आल्याची नेहमीची आठवण पवारांनी यावेळी पुन्हा एकदा करून दिली.

काय म्हणाले शरद पवार?

नेतृत्व कुणी करायचे यावर चर्चा झाली नाही. निवडणूक आल्यानंतर यावर निर्णय होईल. पण महाविकास आघाडीची सत्ता येईल असं चित्र महाराष्ट्रात आहे. मात्र आताच नेतृत्वाचं नाव जाहीर करण्याचं कारण नाही. पण आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ, असे शरद पवार म्हणाले.


Droupadi Murmu महाराष्ट्राची विकासयात्रा वेगाने पुढे जात राहील – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केले होते. तुम्ही जो चेहरा द्याल, त्याला बिनदिक्कत पाठिंबा देऊ, मात्र चेहरा देऊन निवडणूक लढवावी, असा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरला होता. पण त्यावेळीही भाषणात कुणीच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर भाष्य केले नाही. नंतरही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वारंवार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करु लागले, मात्र त्यावर मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिली नाही. आताही शरद पवारांनी प्रतिक्रिया देत ठाकरेंना ही मागणी बाजूला ठेवण्याचा इशारा दिल्याचे दिसते. Sharad Pawar

जागावाटपाचा निर्णय बाकी

दरम्यान, जागावाटपाचा निर्णय झाला नाही, पहिली बैठक देखील झाली नाही. ७, ८, ९ या तारखांना महाविकास आघाडीचे नेते बसतील आणि चर्चेला सुरुवात होईल. यामध्ये आम्हाला साथ दिलेल्या लहान पक्षांना देखील सोबत घेण्याबाबत मी भूमिका घेतली आहे, ती मी सुचवली आहे. लवकरच याबाबत प्रक्रियेला सुरुवात होईल. पण मी या प्रक्रियेत मी नाही, आमचे इतर सहकारी यात चर्चा करतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यात आता आमची जबाबदारी वाढली आहे. मागच्या वेळी देखील उमेदवारांची चणचण नव्हती. आता देखील आमच्याकडे उमेदवारांची चणचण नाही. लोकसभेला भाजपला बहुमत मिळेल असं दाखवलं जात होतं पण ते खरं नव्हतं. आता देखील तसंच चित्र पाहायला मिळेल, असा अंदाज शरद पवारांनी वर्तविला.

Sharad Pawar refusal to announce Chief Minister even in his mind

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात