विशेष प्रतिनिधी
मुंबई : एरवी हिंदुत्वाचा द्वेष, आता दहीहंडीच्या आश्रयाला; पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंदा उतरले महायुतीला ठोकायला!! महाराष्ट्रात मंगळवारी दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना हे काही शहरांमध्ये घडले. Sharad pawar NCP used dahihandi program against mahayuti government
राहुल गांधी जसे निवडणुका आल्यावर “टेम्पल रन” करून “चुनावी हिंदू” बनतात, तसेच पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीतही घडले. शरद पवारांनी देखील मध्यंतरी आपण पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, तेव्हा गाजावाजा करत नाही, असे वक्तव्य केले होते. पण आता मात्र महायुती विरोधात वातावरण तापवायला पवारांची राष्ट्रवादी दहीहंडीच्याच आश्रयाला गेलेली दिसली. जळगाव आणि कोल्हापुरात पवारांच्या राष्ट्रवादीने दहीहंडीच्या निमित्ताने महायुतीच्या सरकारवर निशाणा साधून घेतला.
मुंबईत झळकले महिला गोविंदाकडून बॅनर
भाजपचे वडाळा मतदार संघाचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत महिला गोविंदांनी पोस्टर दाखवली. “अजून किती विरोध, मेणबत्ती जाळून कारायचा, पण नराधमाला कधी जाळायचा??” असे बॅनर या गोविंदानी झळकवले.
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरात काँग्रेस-NC मधील जागावाटप फायनल; 90 पैकी NC 51, काँग्रेस 32 आणि इतर 2 जागांवर लढणार
वरळी कोळीवाड्यात ठाकरे गटाने दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी गोविंदा पथकाकडून थर रचायला सुरूवात करणार एवढयात अँब्युलस आली. त्यावेळी गोविंदानी सामाजिक भान दाखवत अँब्युलसला जाण्यासाठी जागा करून दिली.
जळगावात काळ्या कारनाम्यांची दहीहंडी
एरवी पवारांची राष्ट्रवादी कुठलाही हिंदुत्ववादी कार्यक्रम घेत नाही उलट हिंदुत्व विरोधी कार्यक्रमांना ते प्राधान्य देतात. पण आज जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महायुतीच्या कथित काळ्या कारनाम्यांची आशयाची दहीहंडी फोडली. महायुतीच्या सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यावरूनही महायुती सरकारवर टीका करून निषेध व्यक्त करण्यात आला. वेगवेगळ्या घटनांची बॅनर आणि हातात काळे फुगे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोविंदांनी दहीहंडी फोडून महायुती सरकारचा निषेध केला.
कोल्हापुरात निषेध
दहीहंडीचा मुहूर्त साधत कोल्हापुरात देखील पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंदा आक्रमक झाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला. महायुतीचे काळे कारनामे या आशयाचा पेपर प्रसिद्ध करून त्याचे वाटप कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले. त्यामध्ये महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेल्या कामाचा काळ्या कामांचा पंचनामा केला आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्ष आर. के. पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा पंचनामा करत हे आंदोलन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App