विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयाने विविध राजकीय पक्षांना जुने संसद भवन म्हणजे आत्ताचे संविधान भवन परिसरात कार्यालयांचे वाटप केले. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील कार्यालय मिळाले. मात्र त्या कार्यालयाच्या संदर्भात लोकसभा सचिवालयाने फक्त “राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय” एवढा उल्लेख केला. त्यावरून मराठी माध्यमांनी वेगवेगळे अर्थ काढत असा काही गहजब माजवला, की जणू काही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे भूकंप झाला!!
प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. कारण लोकसभा सचिवालयाने आपली झालेली किरकोळ चूक सुधारून टाकली. शरद पवारांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष” असे करून लोकसभा सचिवालयाने संबंधित कार्यालय त्या पक्षाला देऊन टाकले.
परंतु तत्पूर्वी मराठी माध्यमांनी भाजप आणि शरद पवारांच्या पक्षाची कशी जवळीक निर्माण झाली आहे, असे अर्थ काढले. सुप्रीम कोर्टात शरद पवारांच्या पक्षाबद्दल आणि शिवसेनेबद्दल लवकरच निकाल लागणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी लोकसभा सचिवालयाने शरद पवारांच्या पक्षाचे नाव फक्त “राष्ट्रवादी काँग्रेस” असे लिहिल्याने त्यांनाच तो पक्ष आणि त्यांचे जुने घड्याळ चिन्ह बहाल होणार, असा अर्थ देखील मराठी माध्यमांनी काढला.
हायकोर्टाने 4 दहशतवाद्यांची फाशी जन्मठेपेत बदलली; पाटण्यात मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवला होता
त्यातच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणपतीची आरती केली. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर सरन्यायाधीश अन्याय करणार असल्याची असल्याचा “जावईशोध” संजय राऊत यांनी लावला. त्यात शरद पवारांच्या संसदीय पक्षाच्या संसदीय कार्यालयाच्या वाटपात त्यांच्या पक्षाचे नाव फक्त राष्ट्रवादी काँग्रेस एवढेच लिहिल्याने माध्यमांना पवारांची भरामण करण्यासाठी नवा विषय मिळाला.
पवारांच्या पक्षाचे 8 खासदार निवडून येऊनही देखील पवारांच्या पक्षाला कार्यालय दिले नाही, अशी हाकाटी काल काही मराठी माध्यमांनी पिटली, पण प्रत्यक्षात पवारांच्या पक्षाला कार्यालय मिळाले होते. त्यावर फक्त “राष्ट्रवादी काँग्रेस” एवढेच नाव लिहिले होते. त्यावरून देखील मराठी माध्यमांनी गहजब माजवून महाराष्ट्रात भूकंप झाल्याच्या बातम्या दिल्या. परंतु, प्रत्यक्षात लोकसभा सचिवालयाने आपली झालेली किरकोळ चूक सुधारून त्या बातम्यांवर पाणी फिरवले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more