Manoj jarange : राहुल गांधींचा विषय मनोज जरांगेंनी झटकला; पण पुन्हा देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा!!

Manoj jarange

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतात असताना जातीगत जनगणनेचा विषय लावून धरत सातत्याने मोदी सरकारला टार्गेट करणाऱ्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा केली काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर योग्य वेळी आरक्षण संपवण्यासाठी विचार करेल, असे वक्तव्य राहुल गांधींनी जॉर्ज टाउन विद्यापीठात केले. त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे अडचणीत आली.

मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले, पण त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय लावून धरणारे आणि त्यानिमित्ताने फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणारे मनोज जरांगे यांनी देखील सुरुवातीला राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना नेमक्या याच मुद्यावर घेरले. त्यामुळे मनोज जरांगे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. पण ती प्रतिक्रिया किरकोळच ठरली. किंबहुना मनोज जरांगे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विषय झटकून टाकायचा प्रयत्न केला.

मात्र त्याचवेळी मनोज जरांगे यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपोषण आंदोलनावर टीका करताना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत, राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले.

आमदार राऊत यांच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. गोरगरिबांच्या लोकांसाठी आम्ही लढत आहोत. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत, असे म्हणत राऊत यांचे आंदोलन सरकारी असल्याचा टोला जरांगेंनी लगावला.


हायकोर्टाने 4 दहशतवाद्यांची फाशी जन्मठेपेत बदलली; पाटण्यात मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवला होता


आमदार राजेंद्र राऊत यांनी सुरु केलेल्या आंदोलनास सरकारी आंदोलन म्हणत फडणवीसांनाही लक्ष्य केलं. समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे, समाज हुशार आहे, समाज सगळं बघतोय. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली ना, दिवस जवळ आले आहेत, समाज सगळं बघतोय, त्यांचा हिशेब होणार, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनावर तोफ डागली आहे. राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे, राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले किती गेले हे सगळे भाजप संपणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांच्याविरुद्ध बोलणाऱ्या भाजप आमदार व नेत्यांवर जरांगेंनी पलटवार केला आहे. तसेच, कोणी लक्ष द्यावं म्हणून मी उपोषण कधीच करणार नाही, एक वर्ष झालं मी समाजासाठी आंदोलन करतो. मी कसला विचार करत नाही, मी कोण येणार आहे, कोण येणार नाही. थोडे दिवस थांबा तुमचं राजकीय करिअर बाद करतो, असेही जरांगे यांनी भाजप नेत्यांना म्हटलं आहे.

फडणवीस फोडाफोडीत हुशार

असलं रडकं सरकारच नाही बघितलं मी केव्हाच, फडणवीस साहेब लय हुशार आहेत, चाणक्य असं वाटायचं. पण, ते फक्त फोडाफोडीत हुशार आहेत. फडणवीस साहेब तुम्हाला इमानदारीने सांगतो तुम्हाला विरोधक, शत्रू मानलेलं नाही, तुम्ही आरक्षण देऊन टाका, असे जरांगे यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींचा विषय झटकला

आरक्षण रद्द करायचा विचार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं, त्यासंदर्भात जरांगे यांनी भूमिका मांडली आहे. काय करायचं कर म्हणा, आली तर पाहिजे ना सत्ता त्यांची, यायच्या आधीच कुठून रद्द करतो. त्याची सत्ता तर आली पाहिजे ना. परदेशातून बोलला की समुद्रात उभा राहून बोलला मला काय माहिती. त्यांचा राजकीय मामला आहे, तो आमच्याशी काही संबंध नाही.

सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या : राऊत

स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा समाजाला झुलवत ठेवू नये व महाराष्ट्राचा मणिपूर करु नये. सर्वच राजकीय पक्षांनी अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवून त्यात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे. तसेच, जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल तर तसे सांगावे. मात्र, समाजाला झुलवणे बंद करावे. त्यासाठी, राज्यातील सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असा टोलाही राऊत यांनी नाव न घेता मनोज जरांगेंना लगावला.

Manoj jarange skips to target rahul Gandhi, but targets devendra fadnavis again

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात